सुनील पाटीलजळगाव : नाशिक परिक्षेत्रात जानेवारी ते नोव्हेंबर या महिन्याच्या कालावधीत २१४ जणांचा खून झाला आहे. ४०५ महिलांवर बलात्कार तर १ हजार २६८ महिलांचा विनयभंग झाला आहे. बाललैंगिक अत्याचाराच्याही २२५ घटना घडल्या आहेत. सर्वाधिक क्राईम अहमदनगर जिल्ह्यात तर त्या खालोखाल जळगाव जिल्ह्यात घडला आहे. खुनाचे २०३ गुन्हे उघड झाले आहे तर ११ गुन्हे अद्यापही उघड झालेले नाहीत.नाशिक परिक्षेत्रातील नाशिक ग्रामीण, जळगाव, अहमदनगर, धुळे व नंदूरबार या पाच जिल्ह्यांची गुन्हेगारीची माहिती ‘लोकमत’ ला प्राप्त झाली आहे. जळगाव जिल्ह्यात ५६ खून झाले आहेत, त्यातील ५४ गुन्हे उघडकीस आले आहेत.घरफोडी, दरोडा व चोरीच्या घटना सर्वच जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात घडल्या आहेत, त्या तुलनेत गुन्हे उघडकीस आलेले नाहीत. परिक्षेत्रात एकूण १ हजार ५४२ घरफोडीच्या घटना घडल्या असून त्यात फक्त २६७ घटना उघड झाल्या आहेत. अहमदनगरमध्ये ६६३, नाशिक ग्रामीण २८५, जळगाव ३३४, धुळे १८५ तर नंदूरबार जिल्ह्यात ७५ घरफोड्या झाल्या आहेत. परिक्षेत्रात चोरीच्या ५ हजार ७९४ घटना घडल्या असून त्यातील १ हजार ७१३ घटना उघड झाल्या आहेत.मालमत्तेच्या गुन्ह्यात कामगिरी ढासळलीपरिक्षेत्रात दरोड्याच्या ६६ घटना घडल्या आहेत. त्यात सर्व घटना उघड झाल्या आहेत. सोनसाखळी लांबविण्याच्या १६० घटना घडल्या आहेत त्यातील फक्त ४६ घटना उघड झाल्या आहेत. सर्वाधिक ८८ घटना या अहमदनगर जिल्ह्यात, त्याखालोखाल २६ घटना जळगाव जिल्ह्यात घडल्या आहेत.दरोडा, बलात्कार, बाललैंगिक अत्याचार, दरोड्याची तयारी व बलात्कार या सारख्या सर्वच घटनांमध्ये आरोपींना अटक करण्यात आली आहे. शरीराविरुध्दच्या गुन्ह्यात पोलीस दलाची कामगिरी सरस आहे, तर मालमत्ताविरुध्दच्या गुन्ह्यांमध्ये कामगिरी ढासळलेली आहे.जळगावची कामगिरी सरस..पणनाशिक परिक्षेत्रात गुन्हे उघडकीस आणण्यात जळगाव जिल्ह्याची कामगिरी सरस ठरली आहे. दाखल खुनाच्या गुन्ह्यातील ५६ पैकी ५४ गुन्हे उघडकीस आले आहेत. निंबोल दरोडा ही घटना फक्त पोलिसांसाठी आव्हान कायम ठरली आहे. घरफोडीच्या ३३४ घटना घडल्या आहेत त्यातील २७० घटना उघडकीस आणण्यासह बहुतांश घटनांमधील रोख किंवा दागिन्यांचा मुद्देमाल वसूल करुन तो मुळ मालकांना परत करण्यात आला आहे.दीड हजाराच्यावर दंगलीजानेवारी ते नोव्हेंबर या कालावधीत नाशिक परिक्षेत्रात १ हजार ५०७ दंगली झाल्या आहेत. त्यात अहमदनगर जिल्ह्यात ६६०, नाशिक ग्रामीण ३१४, जळगाव २९०, धुळे १७७ व नंदूरबार जिल्ह्यात ६६ दंगलीचे गुन्हे दाखल आहेत. ठकबाजीचे ६०० तर विश्वासघात केल्याचे १७७ गुन्हे दाखल झाले आहेत. उघडकीस येण्याचे प्रमाण ९४ व ८२ टक्के आहे.सरकारी नोकरांवर हल्लेसरकारी अधिकारी व कर्मचाऱ्यांवर हल्लयाच्या घटना कमालीच्या वाढल्या आहेत. त्यात ११४ पोलिसांवर हल्ले झाले आहेत. अहमदनगरमध्ये ५२, नाशिक ग्रामीण १८, जळगाव २२, धुळ्यात ३१ व नंदूरबारात १८ पोलिसांवर हल्लयाचे गुन्हे दाखल झाले आहेत. इतर विभागाच्या कर्मचाऱ्यांवर हल्लयाच्या २३६ घटना घडल्या आहेत.
अबब..... ११ महिन्यात २१४ खून, ४०५ बलात्कार, का वाढत आहे नाशिक परिक्षेत्रात ‘क्राईम’?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2019 12:37 PM