जळगाव : जळगाव जिल्ह्यात बुधवारी कोरोनाचा विस्फोटच झाला. एकाच दिवसात तब्बल १७० नवीन कोरोना बाधित रूग्ण आढळून आले. आता जळगाव जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या ही २७५७ इतकी झाली आहे़ आतापर्यंत ही रूग्ण आढळून आल्याची सर्वात जास्त संख्या आहे.जिल्ह्यात कोरोना विषाणूने अक्षरश: थैमान घातले आहे. दिवसागणिक कोरोना लागण झालेल्या रूग्णांच्या संख्येत लक्षणीय वाढत होताना दिसून येत आहे. रूग्ण बरे होण्याचे प्रमाण जरी समाधानकारक असले तरी पॉझिटिव्ह रूग्ण आढळून येण्याचे प्रमाणही वाढले आहे.या ठिकाणी आढळले पॉझिटिव्ह रूग्णपॉझिटिव्ह आढळलेल्या व्यक्तींमध्ये जळगाव शहर ४२, पारोळा २२, रावेर १९, भुसावळ ११, जळगाव ग्रामीण, पाचोरा, जामनेर प्रत्येकी १०, यावल, मुक्ताईनगर प्रत्येकी ०८, अमळनेर ०७, चोपडा ०६, धरणगाव, चाळीसगाव प्रत्येकी ०५, भडगाव, एरंडोल, बोदवड प्रत्येकी ०२, दुसऱ्या जिल्ह्यातील ०१ रूग्णांचा रुग्णाचा समावेश आहे.
अबब ! तब्बल नवीन १७० कोरोना बाधित रूग्ण आढळले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2020 6:57 PM