जळगाव : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संचारबंदी असल्याने खाद्य पदार्थांची दुकानेही बंद आहे. या परिस्थितीत जिल्हा रुग्णालयातील रुग्ण, निराधार व्यक्तींना शिवभोजन पॅकिंग करून वाटपाचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. त्यानुसार बहुतांश शिवभोजन केंद्र्रातर्फे भोजनाची थाळी पॅकिंग करून गरजूंना वाटप केले जात आहे.गोलाणी संकुलातील युवा नामदार बहुउद्देशीय संस्थेतर्फे सकाळी अकरा वाजेपासून शिवभोजनाची थाळी कागदाच्या पॅकिंगमध्ये बांधून वाटप करण्यात आली. थाळी पॅकिंग देताना तोंडाला मास्क लावून काळजी घेतली जात आहे.शिवभोजन घेणाऱ्यांनाही मास्क बांधूनच थाळी घेऊन इतर ठिकाणी वेगवेगळेपणे भोजन घेण्याच्या सूचना दिल्या जात आहे. यामुळे गरजूंचा एकमेकांशी संपर्कही टळत आहे.पॅकिंग देताना अंतर राखूनच देण्यात आल्याने कोरोनाचा प्रादुर्भाव टाळता येण्यास मदत झाल्याची माहिती शिवभोजन केंद्राचे संचालक परवेझ पठाण यांनी दिली. माथाडी कामगार, लोटगाडीवर काम करणाºया गरजूंनी सकाळीच येऊन शिवभोजनाची मागणी केली. त्यांना अकरा वाजेपासून शिवभोजन पॅकिंग करून देण्यात आले. सुमारे शंभर लाभार्थ्यांना याचा लाभ देण्यात आला.पार्सल वाटप केल्याची नोंदही ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
शिवभोजन केंद्रांवरून पार्सल देऊन उदरभरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2020 8:28 PM