जळगाव : तीन लाख रूपयांच्या खंडणीसाठी पुण्यातील व्यावसायिक यज्ञेश विनोद तिलवा यांचे अपहरण करून त्यांना दोघांनी जळगावात आणले. ही माहिती शहर पोलिसांना मिळताच त्यांनी मंगळवारी रात्री ८़३० वाजेच्या सुमारास त्या अपहृत व्यावसायिकाची सुटका करीत दिलीप जगन अवसरमल (रा़ पुणे) व गणेश एकनाथ मोळे (रा़ झाशी, उत्तरप्रदेश) या दोन अपहरणकर्त्यांना ताब्यात घेतले आहे़पुणे येथील यज्ञेश विनोद तिलवा याने कंपनी तयार करून अनेकांकडून पैसे जमा केले. दिलीप जगन अवसरमल व गणेश मोळे या दोघांनीही या कंपनीत पैसे अडकविले होते. दिलीप अवसरमल व गणेश मोळे या दोघांना यज्ञेश यांच्याकडून तीन लाख रुपये घेणे होते. दोघे यज्ञेशकडे पैश्यासाठी तगादा लावत होते. तरी देखील यज्ञेश यांनी पैसे दिले नव्हते. दिलीप व गणेश पैश्यासाठी यज्ञेश याला वारंवार फोन करीत होते. यज्ञेश फोन देखील उचलत नसल्याने व पैसेही देत नसल्याने सोमवारी दुपारी दिलीप अवसरमल व गणेश मोळे या दोघांनी एमएच़१२़एनबी़ ०७४९ क्रमांकाच्या कारमध्ये यज्ञेश यांना बळजबरी बसवून त्यांचे अपहरण केले होते. त्यानंतर याप्रकरणी पिंपरी-चिंचवड पोलीसात यज्ञेश याची पत्नी स्वाती तिलवा यांच्या फिर्यादीवरून दिलीप अवसरमल व गणेश मोळे या दोघांविरुध्द अपहरण व खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. दोघांनी अपहृत यज्ञेश याला पुण्याहून कारने चाळीसगाव येथे आणले. त्यानंतर यज्ञेश व दोघांना समझोता झाला. त्यानंतर यज्ञेश याला घेवून दोघे मंगळवारी सकाळी जळगावात आले.यज्ञेश याला घेवून दोघे रेल्वेस्टेशन परिसरातील एका हॉटेलात थांबले होते़ त्यानंतर त्यांनी पुन्हा चाळीसगाव येथून तीच कार जळगावी बोलविली. मंगळवारी सायंकाळी कारचालकासह अन्य एक जण व अपहृत यज्ञेश तिलवा, दिलीप अवसरमल व गणेश मोळे हे पाचही जण जळगाव येथून पुन्हा पुणे येथे जाणार होते.शहर पोलीसांना मिळाली माहितीयज्ञेश तिलवा यांना गणेश मोळे व दिलीप अवसरमल या दोघांनी अपहरण करून त्याला जळगावात आणले असल्याची माहिती पिंप्री चिंचवड पोलीसांना मिळाली.त्यानुषंगाने पिंपरी-चिंचवड येथील आयुक्त यांनी जळगाव पोलीस अधीक्षक डॉ. पंजाबराव उगले यांच्याशी संपर्क करून घटनेबाबत कळविले.त्यानंतर पोलीस अधीक्षक डॉ. उगले यांनी शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रविकांत सोनवणे व स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बापु रोहम यांना संशयितांचा शोध घेण्याबाबत सुचना केल्या. दरम्यान संशयित रेल्वेस्टेशन परिसरात असल्याची माहिती शहर पोलीसांना मिळाली होती.हॉटेलमधून दोघांना घेतले ताब्यातशहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रविकांत सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेकॉ. विजयसिंग पाटील, प्रितम पाटील, सुनिल पाटील, नवजीत चौधरी, गणेश पाटील, तेजस मराठे यांनी स्टेशन परिसरातून मंगळवारी रात्री दिलीप अवसरमल व गणेश मोळे या दोघांना एमएच़१२़एनबी़०७४९ क्रमांकाच्या कारसह ताब्यात घेवून अपहृत यज्ञेशची सुटका केली. पोलीसांनी कारचालकासह अन्य एकाला देखील ताब्यात घेतले होते.
अपहरण झालेल्या पुण्यातील व्यावसायिकाची जळगावात सुटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2019 11:55 AM