चुडामण बोरसेशिक्षण घेऊन मोठं झालो की, संवेदना विकसित करण्यासाठीचे प्रोग्राम जॉईन करावे लागतात. कारण आताची शिक्षणपध्दती संवेदना विकसित करणारी नाही, हे दुर्दैव आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ अभिनेते डॉ. मोहन आगाशे यांनी ‘लोकमत’ला सांगितले. रोटरी क्लबच्या कार्यक्रमासाठी जळगावात आलेल्या आगाशे यांनी ‘लोकमत’शी संवाद साधला.तरूणांसाठी आपण अभियान राबवताय? नेमका काय उद्देश आहे?अभियानवगैरे म्हणण्याएवढं काही मोठं नाही. पण तरूणांमध्ये संवेदनशीलता असली पाहिजे, असा आपला प्रयत्न आहे. त्यासाठीच कार्यक्रम घेत फिरत आहे.जागृती अभियानासाठी सिनेमा हेच माध्यम का निवडलं?माझ्या वैयक्तिक अनुभवावरून हे लक्षात आले की, सिनेमा हे एक असे सोपे माध्यम आहे की, ज्या माध्यमातून आपण आपले विचार लोकांच्या मनात उतरवू शकतो. पूर्वीच्या लोकांमध्ये संवेदना होती. आज ती पूर्णपणे हरवली आहे. कारण मानसिकता हा विषयच नष्ट झाला आहे. जीवशास्त्रातून पुढे आलेला कोणीही माणूस हा मानसिकता बघतच नाही केवळ इंद्रियेच पाहून निदान काढतो आणि मन हे काही इंद्रीय नाही. आपले शरीर हे कंटेनर आहे आणि मन हे ‘कन्टेन्ट’ आहे, म्हणजेच कंटेनरमधील साहित्य आहे.आताच्या तरूणांबद्दल काय सांगता येईल?तरूणपणात प्रत्येकाने अनेक विषय पाहिले पाहिजेत. त्यामुळेच कळते की, तुमची क्षमता काय आहे आणि तुम्हाला कोणत्या गोष्टीत जास्त स्वारस्य आहे? आपल्या क्षमतेवर जेव्हा स्वारस्य मात करते, तेव्हा माणूस नैराश्यग्रस्त होतो. नैराश्य हा आजार असा आहे की, कधी कधी ते लक्षातही येत नाही, त्यालाच मास्ट डिप्रेशन म्हणतात. या आजाराने अनेक तरूण पिडीत आहेत.चित्रपटनिर्मिती हा माझा छंद कधीच नव्हता. मला कलाकार म्हणून जगायचे आहे. पण कासव या चित्रपटाची कथा छान होती आणि यामध्ये माझा ‘रोल’ चांगला होता. म्हणून मी निर्माता होण्याचे ठरवले, एवढंच.नवीन चित्रपटाबद्दल काही...मला जीवनाचा दर्जा या विषयावर सिनेमा काढायचा आहे. स्वातंत्र्य हवे म्हणजे काय? लहानपणी आपण इतरांवर अवलंबून असतो. मोठे होतो पैसे कमावतो, स्वातंत्र्य होतो. स्वातंत्र्य झाल्यानंतर आईवडिलांची अडगळ वाटू लागते. त्यांना एखादी पॉश व्यवस्था करून देतो, पण आपल्यापासून दूर ठेवतो. अरे, पहिले बघा तर त्यांना ती पॉश व्यवस्था हवेय की तुम्ही...? नंतर आपणही म्हातारे होतो आणि पुन्हा पारतंत्र्यात जातो. हे कसलं आहे स्वातंत्र्य? याच विषयावर बेतलेला माझा सिनेमा आहे.तरूण ही या देशाची मोठी शक्ती आहे. या शक्तीचा योग्य ठिकाणी वापर झाला तर देश कितीतरी पुढे जाईल. - मोहन आगाशे
संवेदना विकसित करण्याची क्षमता शिक्षणात नाही - मोहन आगाशे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2020 12:41 PM