लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव - मेहरुण परिसरातील शिवाजी उद्यानात महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या शंभरावर कर्मचार्यांना सोबत घेत गुरुवारी स्वच्छता अभियान राबविण्यात आले. तत्पूर्वी नगरसेवक कैलास सोनवणे व सुनील महाजन यांनी संबंधित उद्यानाची पाहणी केली. त्यानंतर उद्यानाची दुरवस्था पाहून त्यांनी तत्काळ विधायकतेचा आदर्श घालून देत उद्यान परिसरात स्वच्छता अभियान राबवून २० ट्रॅक्टरच्या मदतीने कचर्याची उचल करून ते चकाचक केले.
गेल्या काही वर्षांपासून मेहरुण परिसरातील शिवाजी उद्यानाची दुरवस्था झालेली होती. त्यामुळे या उद्यानाची प्रतिमा गर्दुल्यांचे निवासस्थान म्हणून परिचयास आलेली होती. त्यामुळे येथे दिवसभर गर्दुल्यासंह विविध विकृतींचे केंद्र व गुन्हेगारांचे आश्रयस्थान म्हणून ओळखले जात होते. या अनुषंगाने या उद्यानासंदर्भात नगरसेवक कैलास सोनवणे व सुनील महाजन यांनी विस्तृत चर्चा केली. स्वच्छता अभियान राबवून परिसरातील उद्यानाचा कायापालट करण्याच्या हा चांगला प्रयत्न असल्याचे अनेकांकडून म्हटले जात आहे.