जळगाव : शिडी येथे श्री साईबाबा यांचे दर्शन घेऊन घरी परत जाणा:या छत्तीसगडच्या चार तरुणांची कार अडविणा:या व पाच हजार रुपये दिल्यानंतरही जादा पैशांची मागणी करणा:या शहर वाहतूक शाखेच्या कर्मचा:यांना या तरुणांनी चांगलीच अद्दल घडविली. ही घटना आकाशवाणी चौकात रविवारी दुपारी एक वाजेच्या सुमारास घडली. कार अडविल्यापासून तर पैसे मागणीचा प्रकार तरुणांनी मोबाईलमध्ये रेकॉर्ड केला व त्यांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांना भेटण्याचा हट्ट धरल्याने पोलिसांनी नमते घेत स्वीकारलेले पाच हजार रुपये परत केले व माफीही मागितली. त्यानंतर तीन तासानंतर या वादावर पडदा पडला.छत्तीसगड येथील निरंजनकुमारसह 4 तरुण रविवारी दुपारी शिर्डी येथून कारने (क्र.सी.जी.04 डी.एम.8001) घरी परत जात असताना आकाशवाणी चौकात डय़ुटीला असलेले शिवाजी माळी व रवींद्र मोरे या वाहतूक पोलिसांनी कार थांबवली. चालकाकडे कागदपत्रे व वाहन चालविण्याचा परवाना मागितला. त्यांनी कागदपत्रे सादर केल्यानंतर त्यात पीयुसी तपासणीची कागदपत्रे नव्हती. यावेळी यातील एका कर्मचा:याने या तरुणांकडे पाच हजाराची मागणी केली. त्यांनी रक्कम दिली, त्यांच्याकडे रक्कम जास्त असल्याचे निदर्शनास आल्याने आणखी पैशाची मागणी झाली. ती रक्कम देण्यास नकार दिला असता तरुण व कर्मचारी यांच्यात वाद झाला. यावेळी एका तरुणीने व्यवहार व त्यांच्यातील संवाद मोबाईलमध्ये रेकॉर्डीग केले. शीटखाली लपविली कागदपत्रेतीन तासाच्या गोंधळानंतर कर्मचा:यांनी माफी मागितली व त्या तरुणांनी लेखी लिहून दिल्यानंतर वाद मिटला. यावेळी पोलिसांनी कागदपत्रे हिसकावून लपविल्याचा आरोप या तरुणांनी केला, मात्र वाहतूक शाखेच्या आवारातच अन्य कर्मचा:यांमार्फत सर्वाची झडती घेण्यात आली, परंतू कागदपत्रे कोणाजवळ मिळाले नाहीत. कारची तपासणी केली असता शीटच्या खाली कागदपत्रे आढळून आली.रेर्कार्डीग झाल्याचे पाहून कर्मचा:यांनी नमते घेत स्वीकारलेले पैसे परत केले. त्यामुळे या तरुणांनी आक्रमक भूमिका घेत आम्हाला पोलीस अधीक्षकांनाच भेटायचे आहे असा आग्रह धरला. भर चौकात हा धिंगाणा सुरु असताना बघ्यांची मोठी गर्दी झाली होती. वाहतूक शाखेचे सहायक निरीक्षक प्रदीप देशमुख यांनी घटनास्थळी भेट दिली. या चौघांना वाहतूक शाखेत आणण्यात आले. तेथे दोघांची बाजू ऐकून घेत समजूत घालण्याचा प्रय} केला, मात्र पोलीस नरमल्याचे पाहून हे तरुण आणखी जास्त अडून बसले. सिगAलवर वाहतुकीच्या नियमाचे उल्लंघन केल्याने कार थांबविण्याचा इशारा केला, मात्र चालकाने कार थांबवली नाही, नंतर पुढे कार थांबविण्यात आली. पाच हजार रुपये मागितले नाहीत.1 हजार 750 रुपयांचा दंड सांगितल्यावर त्यांनी फक्त 750 रुपये दिले. उर्वरित रक्कम मागितली असता त्यांनी वाद घातला व आम्ही तुमचे रेकॉर्डीग करतो अशी धमकी देत होते.सिगAल उल्लंघन, भरधाव वेगाने वाहन नेणे, थांबविण्याचा इशारा करुनही न थांबणे असे एक हजार 750 रुपये त्यांच्याकडून वसूल करण्यात आले. -शिवाजी माळी, वाहतूक पोलीसगैरसमजुतीतून हा वाद झाला होता. कार्यालयात चारही तरुणांची समजूत घालण्यात आली. नंतर पोलीस निरीक्षक अनिल देशमुख यांनीही त्यांना समजावले. शेवटी नियमानुसार दंड भरल्यानंतर वाद मिटला व ते तरुण पुढच्या प्रवासाला रवाना झाले. -प्रदीप देशमुख, सहायक निरीक्षक, वाहतूक शाखा
छत्तीसगडच्या तरुणांनी पोलिसांना घडविली अद्दल
By admin | Published: January 09, 2017 7:45 PM