जळगाव : निवडणूक खर्च सादर न करणे, हिशेबात तफावत, खर्च तपासणीस गैरहजर राहणे अशा विविध कारणांनी निवडणूक निर्णय अधिकारी तथा अप्पर जिल्हाधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी रावेर मतदार संघातील ११ जणांना नोटीस काढल्या आहेत. यात युतीच्या उमेदवार खासदार रक्षा खडसे, आघाडीचे उमेदवार माजी खासदार डॉ. उल्हास पाटील यांच्यासह माघार घेतलेले सुनील पंडित पाटील, सुनील संपत जोशी, रवींद्र दंगल पवार यांचाही समावेश आहे. संबधितांना दोन दिवसात आपले म्हणणे सादर करण्याचे सूचित करण्यात आले आहे. दरम्यान, शनिवारी जळगाव मतदार संघातील ८ जणांना नोटीस बजावल्यानंतर रावेर मतदार संघातील उमेदवारांनाही नोटीस बजावण्यात आल्या आहेत.निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांसह उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या प्रत्येक उमेदवाराने तसेच उमेदवारी जाहीर झालेल्या उमेदवारानेही आपला निवडणूक खर्च सादर करणे बंधनकारक असताना रावेर मतदार संघातील ११ जणांनी निवडणूक खर्च सादर न केल्याने त्यांना रविवारी नोटीस काढण्यात आल्या आहेत.हिशोब सादर नाहीरावेर लोकसभा मतदार संघातील काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे उमेदवार डॉ. उल्हास पाटील यांचा निरीक्षण नोंद वहीनुसार एख लाख ४३ हजार ८३५ रुपये खर्च झाला आहे. मात्र हा खर्च उमेदवाराकडे नमूद केलेला नसल्याने निवडणुकीचा खर्चाचा दैनंदिन हिशोब नियमानुसार ठेवलेला नसल्याच्या कारणावरून त्यांना नोटीस बजाणण्यात आली आहे. या सोबतच निवडणूक लढविण्याºया उमेदवारांनी आपली निवडणूक खर्च हिशोब नोंदवही घेऊन ११ एप्रिल रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील निवडणूक खर्च शाखेत स्वत: अथवा प्राधिकृत केलेल्या प्रतिनिधींनी उपस्थित राहण्यासंदर्भात सूचित करूनही ११ रोजी उपस्थित राहिने नसल्याचाही उल्लेख नोटीसीत आहे. त्यामुळे दोन दिवसात खुलासा सादर करण्याचे सूचित केले आहे.अशाच प्रकारे रावेर लोकसभा मतदार संघातीलच भाजप-शिवसेना युतीच्या उमेदवार रक्षा खडसे यांनाही याच कारणावरून नोटीस बजावण्यात आली आहे. खडसे यांचा खर्च एक लाख ३४ हजार ९९५ झाला असून हा खर्च उमेदवाराकडे नमूद केलेला नाही.उमेदवारी अर्ज दाखल करून माघार घेतलेले सुनील पंडीत पाटील, सुनील संपत जोशी, रवींद्र दंगल पवार यांनी खर्च सादर न केल्याने त्यांना नोटीस काढून दोन दिवसात खुलासा सादर करण्याचे सूचित केले आहे.
निवडणूक खर्चासंदर्भात डॉ. उल्हास पाटील, रक्षा खडसे यांच्यासह ११ जणांना नोटीस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2019 11:42 PM