जळगाव : कंपनीत पुढे जायचे असेल तर बॉसला खुश करावे लागेल, असे सांगून मुलाखतीसाठी आलेल्या दोन तरुणींना अनैतिक संबंध ठेवण्याची मागणी करणाऱ्या एमआयडीसीतील एका कंपनी शोरुमचा व्यवस्थापक आतिष अशोकराव कोलारकर (३४ रा. नाशिक) यास जिल्हा न्यायालयाने एक वर्ष सक्तमजुरी व अडीच हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. न्या.मंजुषा नेमाडे यांनी सोमवारी हा निकाल दिला.जळगाव शहर तसेच पारोळा येथील तरुणी नोकरीच्या शोधात होत्या. दोघांना एमआयडीसी परिसरातील या कंपनीच्या शोरुममध्ये जागा असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार या तरुणी नोकरीसाठी तेथे गेल्या. ४ नोव्हेंबर २०१४ रोजी शोरुमचे व्यवस्थापक मनिष खैरनार यांनी मुलाखत घेतली. नोकरीबाबत नंतर कळवू असे सांगण्यात आले. पुन्हा बोलाविण्यात आल्यानंतर तरुणी पुन्हा तिच्या नातेवाईकासोबत शोरुममध्ये मुलाखतीसाठी गेली. व्यवस्थापक खैरनार यांचा अपघात झाल्यामुळे त्याच्या जागी कोलारकर याची तात्पुरती नियुक्ती करण्यात आली होती.सहा जणांची साक्षएमआयडीसीचे तत्कालीन सपोनि आर.टी.धारबळे व भरत लिंगायत यांनी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. न्या. मंजुळा नेमाडे यांच्या न्यायालयात हा खटला चालला. यात सरकारपक्षातर्फे पिडीत दोघी तरुणी, फिर्यादीची मैत्रीण, वैशाली विसपुते, पंच गोकूळ धोंडू सोनार, धारबळे, कंपनीे व्यवस्थापक मनिष खैरनार यांची साक्ष नोंदविण्यात आली. साक्षी ग्राह्य धरत न्या. नेमाडे यांनी कोलारकर यास शिक्षा सुनावली. तसेच दंडाची एकूण रक्कम ४ हजार ५०० रुपयांपैकी १५०० रुपये फिर्यादी तसेच पिडीत अशा दोघांना देण्याचे आदेश केले. सरकारपक्षातर्फे अॅड. रंजना पाटील यांनी काम पाहिले. पैरवी अधिकारी म्हणून मुशीर तडवी यांनी सहकार्य केले.
तरुणींशी गैरवर्तन करणारा खातोय तुरुंगाची हवा, व्यवस्थापकाला एक वर्ष सक्तमजुरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2019 12:01 PM