लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव - महामार्ग क्रमांक ६ च्या चौपदरीकरणाच्या कामाला अनेक वर्षांपासून सुरुवात झाली असून, गेल्या दोन वर्षांपासून थांबलेल्या व जळगाव शहरालगत जाणाºया बायपासच्या कामाला देखील आता वेग आला आहे. आव्हाणे, भोकणी शिवारात होत असलेल्या गिरणा नदीवरील प्रस्तावित पुलाच्या कामाला सुरुवात झाली असून, आता ममुराबाद व जळगाव लगतचा शेत शिवारात बायपासचा कामाला वेग आला आहे. अनेक शेतामधील पीकं काढून त्या ठिकाणी बायपास च्या कामासाठी च्या भराव टाकण्याचे काम जोरात सुरू झाले आहे.
हाजीरा ते कोलकाता दरम्यान येणाºया राष्टÑीय महामार्ग क्रमांक ६ च्या चौपदरीकरणाचे काम गेल्या काही वर्षांपासून सुरु आहे. मात्र, काही जिल्ह्यात या कामांचा वेग अतिशय संथ आहे. तरसोद ते फागणे पर्यंतच्या कामाला सुरुवात झाली आहे. मात्र, धुळे ते तरसोदपर्यंतचे काम काही वर्षांपासून थांबले होते. आता चार महिन्यांपासून या कामाला देखील आता सुरुवात झाली आहे. पाळधी ते तरसोद पर्यंत २३ किमीचा बायपास जळगाव शहराभोवती जात असल्याने शहरातून जाणाºया महामार्गावरील वाहतुकीची कोंडीचा प्रश्न काही प्रमाणात सुटणार आहे. महामार्गाच्या प्रस्तावित चौपदरीकरण पाळधी ते तरसोदपर्यंत जळगाव शहराला बायपास करून जात आहे.
पाळधी-भोकणी-आव्हाणे-ममुराबाद-असोदा शिवारातून हा सुमारे २३ किमीचा बायपास काढण्यात आला आहे. दरम्यान गिरणा नदी वर देखील पुलाचे काम जोरात सुरू झाले असून, भोकणी शिवारात पुलाचे खांब तयार करण्यात येत आहेत. यासह कानळ दा रस्त्यालगत देखील एक लहान उड्डाणपूल तयार केला जाणार आहे. या ठिकाणी देखील भराव टाकण्याचे काम आता सुरू झाले आहे. बायपासचे काम इंदूर येथील ऍग्रो इन्फ्रा या कंपनीकडून सुरू असून ते 23 किमी चे काम करण्यासाठी सव्वीस महिन्यांची मुदत आहे.