नाशिककडून टमाटे भरून विक्रीसाठी आणणारी एमएच-१५ जीव्ही-५११ क्रमांकाची पीक अप व्हॅन समोरून येणाऱ्या मोटारसायकल ला चुकवायला गेली असता मंगरूळ येथील स्व. अनिल अंबर पाटील माध्यमिक विद्यालयाजवळ असलेले दुभाजक न दिसल्याने वाहन दुभाजकावर चढून ५० मीटरपर्यंत ओढत गेले. त्यानंतर वाहन रस्त्यावर कलंडले. धुळ्याकडून येताना रस्ता मोकळा असून, अचानक शाळेजवळ दुभाजक लागतात. त्यामुळे वाहन चालक गोंधळतात. यापूर्वीही १६ वाहने याठिकाणी दुभाजक न दिसल्याने अपघातग्रस्त झाली असून, वाहनांचे नुकसान होऊन काही जण बचावले आहेत. रस्ता रुंदीकरण काम झाले आहे. मात्र, या ठिकाणी सूचना फलक अथवा रिफ्लेक्टर लावलेले नाही, म्हणून वाहन दुभाजकावर आदळतात आणि अपघात होतात. दुभाजक दिसण्यासाठी मोठा लाइट अथवा रेडियम रिफ्लेक्टर लावण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
दुभाजक न दिसल्याने पलटी झालेले पिकअप व्हॅन.
(छाया : अंबिका फोटो, अमळनेर)