शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election 2024: शेवटचा ‘मास्टर स्ट्रोक’! ‘सुपर संडे’साठी काँग्रेस अन् भाजप नेत्यांचा विदर्भात तळ
2
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
3
तोंडातून उसळे शब्दांचे हे बाण, वेडात प्रचारी वीर दौडले सात...
4
महाराष्ट्रातील आठ लाख नोकऱ्या गुजरातला गेल्या; प्रियांका गांधींचा महायुतीवर हल्ला
5
भारत-चीनमधील तणाव कमी होणे आवश्यक; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे मत
6
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
7
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
8
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
9
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत
10
काँग्रेसने प्रसिद्ध केला मुंबईकरांसाठी स्वतंत्र जाहीरनामा; हाउसिंग सोसायट्यांना ६ महिन्यांत देणार ओसी
11
मतांच्या ढिगाऱ्यात चंगू, मंगू बुडाले पाहिजे; मुख्यमंत्री शिंदे यांची राऊत बंधूंवर टीका
12
मुंबईत तब्बल आठ हजार किलो चांदीचे घबाड केले जप्त; निवडणूक आयोगाची कारवाई
13
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
14
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
15
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
16
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
17
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."
18
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
19
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
20
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल

Accident: धरणगावजवळ भीषण अपघात बीडीओ एकनाथ चौधरी यांचा मृत्यू, पहाटे पाच वाजेची ची घटना! 

By चुडामण.बोरसे | Published: November 23, 2022 12:14 PM

Accident: अमळनेर पंचायत समितीचे सहायक गट विकास अधिकारी व  यावल पंचायत समितीचे प्रभारी गट विकास अधिकारी एकनाथ चौधरी यांचा भीषण अपघातातात मृत्यू झाला.  ही घटना धरणगावनजीक बुधवारी पहाटे पाच वाजता घडली. 

जळगाव - अमळनेर पंचायत समितीचे सहायक गट विकास अधिकारी व  यावल पंचायत समितीचे प्रभारी गट विकास अधिकारी एकनाथ चौधरी यांचा भीषण अपघातातात मृत्यू झाला.  ही घटना धरणगावनजीक बुधवारी पहाटे पाच वाजता घडली. 

ते शासकीय कामासाठी भुसावळहून अमळनेरमार्गे नाशिक जात होते. एकनाथ चौधरी हे चारचाकी वाहनाने (क्र. एमएच १९, डीव्ही ४१९९ ) शासकीय कामासाठी नाशिक जात होते. आज पहाटे पाच वाजेच्या सुमारास धरणगाव अमळनेर रस्त्यावरील भोणे फाट्याजवळ एका ट्रकला त्यांच्या वाहनाने धडक दिली, त्यात त्यांच्या चारचाकी वाहनाचा अक्षरशः चक्काचूर झाला. अपघात एवढा भीषण होता की, त्यात एकनाथ चौधरी हे जागीच  ठार झाले तर चालक गंभीर जखमी झाला आहे. विशेष म्हणजे गाडीच्या दोन्ही एअर बॅग उघडूनही त्यांचे प्राण वाचू शकले नाहीत. तेथील नागरिकांनी तात्काळ १०८ ला बोलावले असताना दोघांना धरणगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासले असता, एकनाथ चौधरी यांना मृत घोषित केले. तर चालकाला जळगाव येथे पुढील उपचारसाठी हलविण्यात आले आहे.

एकनाथ चौधरी हे मुळचे चाळीसगाव तालुक्यातील तरवाडे रहिवासी होते.  भुसावळ येथे वास्तव्यास होते.त्यांच्या मागे आई, पत्नी,दोन मुले असा परिवार आहे घटनेचे वृत्त कळताच अधिकारी व कर्मचारी यांनी रुग्णालयात गर्दी केली. धरणगाव ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. रुग्णालयाच्या आवारात उपमुख्य कार्यकारी अधिकारी नेहा कुडचे-पवार ,धरणगावचे गटविकास अधिकारी सुशांत पाटील आदी उपस्थित होते.

टॅग्स :AccidentअपघातJalgaonजळगाव