रावेर : रावेर आगाराच्या पुणे -रावेर (एमएच २०-बीएल २६५९) बसला मालवाहू वाहनाने (एमएच १९ -एस ९७३७)ने समोरून जबर धडक दिल्याने झालेल्या अपघातात मालवाहू गाडीचा चालक केशव रामचंद्र दाणे (वय ४५) रा. शिरोडा, ता.संग्रामपूर, जि.बुलडाणा हा जागीच ठार झाला.त्यासोबतचा क्लिनर गंभीर जखमी झाला. बसमधील १० प्रवासी किरकोळ जखमी झाले. हा अपघात सिल्लोडकडे येताना के-हाळा फाट्याच्या पुढील वळण रस्त्यावर दुपारी अडीच वाजेच्या सुमारास घडली.याबाबत वडोद बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुणे येथील शिवाजीनगर बसस्थानकातून सकाळी आठ वाजता सुटलेली रावेर आगाराची पुणे - रावेर एसटी बस ही औरंगाबादकडून ६४ प्रवासी घेऊन सिल्लोडकडे येत असताना के-हाळा फाट्याच्या पुढील वळण रस्त्यावर समोरून भरधाव आलेल्या मालवाहू गाडीने वाहकाच्या उलट बाजूने जबर धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात मालवाहू गाडीचा चालक केशव रामचंद्र दाणे हा जागीच ठार झाला. तर त्यासोबतचा मदतनीस गंभीर जखमी झाला आहे. घटनास्थळावरून एसटीचालक राजेंद्र प्रभाकर कोष्टी व वाहक किशोर धुडकू पाटील यांनी सिल्लोड आगारात तातडीने संपर्क साधून बसमधील जखमींना तातडीने खाली उतरवून सिल्लोडच्या रुग्णालयात हलविण्यासाठी प्रयत्न केले.
रावेर आगाराच्या बसला झालेल्या अपघात खाजगी वाहनचालक ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2018 4:20 PM
रावेर आगाराच्या पुणे -रावेर (एमएच २०-बीएल २६५९) बसला मालवाहू वाहनाने (एमएच १९ -एस ९७३७)ने समोरून जबर धडक दिल्याने झालेल्या अपघातात मालवाहू गाडीचा चालक केशव रामचंद्र दाणे (वय ४५) रा. शिरोडा, ता.संग्रामपूर, जि.बुलडाणा हा जागीच ठार झाला.
ठळक मुद्देअपघातात दहा प्रवासी किरकोळ जखमीसिल्लोडजवळील के-हाळा फाट्याजवळील घटनावडोदा बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल