जळगाव : भरधाव वेगाने जाणारा ट्रक ओव्हरटेक करताना समोरील कारवर आदळला.शुक्रवारी दुपारी राष्टÑीय महामार्गावर अजिंठा चौकात हा अपघात झाला. सुदैवाने या कारमधील कोणालाही दुखापत झाली नाही. या कारमध्ये सात महिन्याचा बालकही होता.यावेळी दोन्ही बाजूंनी वाहतुकीची कोंडी झाली होती.भुसावळ येथील चंदण राणे त्यांच्या मालकीच्या कारने (क्र.एम. एच.०५ बीएस ०८१२) जळगावला आले होते. काम आटोपून ते दुपारी परतीच्या प्रवासाला निघालेले असताना मागून वेगात येत असलेला ट्रक (क्र.एम.एच.२० बी.टी.३२५१) ओव्हरटेक करताना कारवर आदळला. यात कारचे किरकोळ नुकसान झाले. कारच्या उजव्या साईडच्या मागच्या दरवाजाला लागून धडक दिली. हा अपघात पाहून राणे कुटुंबिय भयभीत झाले. यावेळी प्रचंड गर्दी झाल्याने वाहतुकीत अडथळा झाला. एमआयडीसी पोलीस स्टेशनचे सहायक निरीक्षक सचिन बागुल यांनी सहकाºयांसह घटनास्थळी धाव घेऊन वाहतूक सुरळीत केली. यावेळी पोलिसांनी दोन्ही वाहनांना एमआयडीसी पोलीस स्टेशनला आणले होते. नशिबाने साथ दिली म्हणून कारमधील कोणालाच खरचटले नाही. आपसात तडजोड झाल्याने याप्रकरणी गुन्हा दाखल झालेला नाही.
महामार्गावर पुन्हा अपघात ट्रक आदळला कारवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2017 12:38 AM