जळगाव : राष्ट्रीय महामार्गावरून उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात जात असलेल्या परीक्षा विभागातील सहाय्यक रविंद्र लक्ष्मण फडके (वय-41, रा़भुसावळ) यांच्या दुचाकीला खाजगी प्रवासी वाहतूक करणा:या जीपने धडक दिली़ यात नाकाला दुखापत झाल्याने जखमी झाले आहेत़ शुक्रवारी सकाळी 10़30 वाजेच्या सुमारास खोटेनगर थांब्यानजीक हा अपघात घडला़ अपघातानंतर जमावाने जीपचालकाला चोप देत वाहनाच्या काचा फोडल्या़ तालुका पोलिसांनी वेळीच त्याला ताब्यात घेतल्याने अनर्थ टळला़रविंद्र फडके उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील परीक्षा विभागात सहायक म्हणून कार्यरत आहेत़ ते भुसावळहून जळगाव रेल्वेने प्रवास करतात़ रेल्वेस्थानक ते उमवि दुचाकीने प्रवास करतात़ शुक्रवारी ते नेहमीप्रमाणे रेल्वेने जळगावात आल़े दुचाकीने (क्र ़ एमएच.19.एडब्लू 1656) उत्तर महाराष्ट्र विद्यपीठात जात असताना 10 वाजेच्या सुमारास खोटेनगर रिक्षा स्टॉपजवळ एरंडोलकडे जात असलेल्या खाजगी प्रवासी वाहतूक करणा:या कालीपीलीने (क्र ़एमएच.19.वाय.5320) धडक दिली. चारचाकी चालकाला नागरिकांकडून चोपअपघातानंतर चारचाकी चालकाला दोषी समजून महामार्गावरून ये-जा करत असलेल्या नागरिकांनी मारहाण केली व दगड मारून जीपच्या समोरील काचा फोडल्या़ माहिती मिळताच तालुका पोलीस ठाण्याचे हेल्मेट नव्हते डोक्यातदुचाकीवरून खाली पडल्याने त्याच्या नाकाला दुखापत झाली़ त्याच्यासोबत उमवित जात असलेल्या कर्मचारी सहका:यांनी त्यांना खाजगी रूग्णालयात दाखल केल़े दरम्यान फडके यांच्याजवळ हेल्मेट होत़े मात्र त्यांनी ते काढून गाडीला लावले होत़े हेल्मेट डोक्यात असते ते दुखापत झाली नसती़
महामार्गावर खोटेनगरनजीक सलग दुस:या दिवशी अपघात
By admin | Published: February 18, 2017 1:03 AM