गलजावडेनजीक रस्त्यावर मोटारसायकल क्रमांक एम. एच. १९ बी. आर. ४३७१ ही एकीकडे व तरुण रस्त्यावर रक्ताच्या थारोळ्यात पडून तडफडत होता. भीतीपोटी कोणी उचलायला तयार नव्हते. १०८ ला फोन लावला होता मात्र रुग्णवाहिका यायला उशीर होत होता. अखेर अमळनेर येथील झामी चौकातील राहुल सोनार हा तरुण त्या ठिकाणी थांबला. त्याने मागाहून येणाऱ्या शिरूड नाक्याच्या सोनू ठाकूर या रिक्षावाल्याला थांबवून त्या जखमी तरुणाला ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. त्याच्या दोन्ही कानांतून रक्त येत होते. डॉ. जी. एम. पाटील यांनी तातडीने त्याच्यावर प्राथमिक उपचार केले. काही वेळात त्या तरुणांच्या भ्रमणध्वनीवर फोन आला असता जखमी तरुण मनोज धोंडू पाटील (रा. अंचळगाव, ता. भडगाव) असल्याचे समजले. मनोज त्याच्या आजीला शिंगावे ता. शिरपूर येथे सोडायला गेला होता. परत येताना त्याचा अपघात झाला. ग्रामीण रुग्णालयात हेड कॉन्स्टेबल भास्कर चव्हाण यांनी भेट दिली. तरुणाची तब्येत गंभीर असल्याने त्याचे नातेवाईक उमेश काटे यांनी त्याला पुढील उपचारासाठी खाजगी रुग्णालयात दाखल केले.
आजीला सोडून परतताना तरुणाला अपघात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2021 4:14 AM