मुक्ताईनगर : १२ वी च्या गणिताच्या पेपर साठी दुई येथून मुक्ताईनगर परीक्षा केंद्रावर परीक्षेस येत असताना कंटेनर व मोटारसायकलच्या अपघातात मंदा अशोक पाटील ही १२ वी ची विद्यार्थिनी गंभीर जखमी झाली. जळगाव येथे उपचारासाठी हलविण्यात आले असता रस्त्यातच तिचा मृत्यू झाला.ही दुर्घघटना २८ रोजी पुर्णाड फाट्याजवळ सकाळी १० च्या सुमारास घडली.या घटनेमुळे हळहळ व्यक्त होत आहे. या अपघातात सदर विद्यार्थिनीच्या आजोबांनाही दुखापत आहे.शुक्रवारी गणित भाग २ चा पेपर असल्याने दुई येथील विद्यर्थिनी मंदा अशोक पाटील (वय १७) ही परीक्षा देण्यासाठी सुकळी येथून आजोबा भगवान गंभीर पाटील यांच्या सोबत मोटरसायकल वर निघाली. दुई ते पूर्णाड फाट्या दरम्यानच्या राशा बरड लगत समोरून येणारे कंटेनर अंगावर आल्याने झालेल्या अपघातात मंदा ही कंटेनरच्या बाजूने पडली आणि अपघातात तिचे दोन्ही पाय तुटले. तात्काळ तिला उपजिल्हा रुग्णालय येथे हलविले असता डॉ. योगेश राणे यांनी प्रथमोपचार केले. मात्र तिचे दोन्ही पाय तुटले असल्याने प्रकृती गंभरीर असल्याचे पाहता तिला अधिक उपचारासाठी जळगाव येथे नेले जात रस्त्यात तिची प्राण ज्योत मालवली. या घटने मुळे हळहळ व्यक्त करण्यात येते आहे. अगदी गावशेजारी घटना घडून ही कंटेनर चालक वाहनासह पसार होण्यात यशस्वी झाला.या बाबत पोलिसात उशिरापर्यंत गुन्हा दाखल नव्हता.पुढील महिन्यात ठरले आहे बहिणीचे लग्नमंदाकिनी हिला एक मोठी बहीण व दोन लहान भाऊ आहेत. वडील शेतकरी असून येत्या २८ मार्च रोजी मोठ्या बहिणीचे लग्न ठरले आहे. घरातील लग्न कार्य तोंडावर असतांना शिक्षणाच्या माध्यमातून भविष्याचा वेध घेणाºया मंदाकिनी वर काळाने झडप घातली. ती मुक्ताईनगर जे.ई. स्कुलची विद्यार्थिनी होती. तीच्या अपघाती मृत्यूची बातमी कळताच गावावर शोक कळा पसरली घरी तर घरी एकच आक्रोश सुरू होता.
परीक्षेस जाणाऱ्या १२ वीच्या विद्यार्थिनीचा अपघाती मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2020 8:59 PM