खिर्डी, ता.रावेर : खिर्डी बुद्रूक येथील रहिवासी जीवन भास्कर पाटील (वय ४१) यांचा अपघातात जागीच मृत्यू झाला. ते फैजपूर येथील मधुकर सहकारी साखर कारखान्याचे कर्मचारी होते. ही घटना शनिवारी सायंकाळी घडली.ते आपल्या शेतातून परत येत होते. तेव्हा चिंच फाटा ते अजंदा दरम्यान सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास रमजू पटेल यांच्या शेताजवळ एका अज्ञात वाहनाने धडक दिल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. शवविच्छेदन रावेर ग्रामीण रुग्णालय येथे करण्यात आले.संदीप अरुण पाटील यांच्या फिर्यादीवरुन निंभोरा पोलीस स्टेशनमध्ये अज्ञान वाहन चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेका बापू पाटील करीत आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगी, आई, वडील, भाऊ असा परिवार आहे. ते भास्कर सीताराम पाटील यांचे चिरंजीव, तर प्रवीण पाटील यांचे मोठे भाऊ होत.
खिर्डी येथील तरुणाचा अपघाती मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 15, 2020 15:47 IST