उत्तम काळेभुसावळ, जि.जळगाव : माणसावर संकट कितीही येवो. जिद्द आणि चिकाटी असली तर त्यावर मात करता येऊ शकते, हे दहावीचा निकाल लागल्यानंतर तालुक्यातील चोरवड येथील अवघ्या सोळा वर्ष वयाच्या आशुतोष गोलांडे या तारुण्यात येणाऱ्या विद्यार्थ्याने दाखवून दिले आहे. खरे, तर ‘देव तारी, त्याला कोण मारी’ याचा एक अनुभवही या विद्यार्थ्याची जिद्द व चिकाटीतून समोर आला आहे. दहावीची परीक्षा अवघ्या दोन महिन्यावर येऊन ठेपली असताना आशुतोषचा अपघात झाला. अपघातात एक पाय पूर्णपणे निकामी झाला, तर दुसºया पायावरही मोठी शस्त्रक्रिया करण्यात आली. मात्र यावेळी आशुतोष आपण अपघातातून वाचलो किंवा आपल्याला अपंगतत्व आले याची काळजी करण्यापेक्षा मी दहावीची परीक्षा कशी देणार, असा प्रश्न त्याने उपस्थित केला व इंग्रजी माध्यमाच्या परीक्षेत तब्बल ९४.४ टक्के गुण मिळवून त्याची जिद्द व चिकाटी हे त्याने दाखवून दिले.भुसावळ तालुक्यातील चोरवड येथील रहिवासी रवींद्र रमेश गोलांडे हे दीपनगर येथे रोजंदारीवर मोलमजुरी करून परिवाराचा गाडा चालवत आहे. त्यांना दोन मुले आहे. मोठा मुलगा आशुतोष हा लहानपणापासूनच हुशार असल्यामुळे त्याला शहरातील ताप्ती पब्लिक स्कूलमध्ये इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिकण्यासाठी दाखल केले. यावर्षी आशुतोष हा दहावीमध्ये शिक्षण घेत होता. त्याला आजोबा रवींद्र गोलांडे हे सकाळी दररोज शिकवणीसाठी शहरात नेत होते. ६ जानेवारी रोजी आजोबा सोबत आशुतोष हा शहरात शिकवणीसाठी जात होता. सकाळी अंधाराची वेळ होती. चोरवडजवळील नाल्याजवळ रस्त्यात पडलेल्या एका बैलगाडीवर त्यांची मोटारसायकल आदळली. यावेळी आशुतोष मोटार सायकलवरून खाली पडला. मात्र त्याचवेळी मागून येणारे एक वाहन त्याच्या दोन्ही पायावरुन गेले. त्यामुळे तो गंभीर जखमी झाला. सकाळी अंधाराच्या वेळेस अगोदर बैलगाडी दिसून आले नाही. त्यात मागून येणारे वाहन हेही दिसले नाही. त्यामुळे आशुतोष आजोबांसोबत रस्त्यात काही वेळ पडला. मात्र त्याला तातडीने उपचारासाठी जळगाव येथे हलविण्यात आले. यात आशुतोषचे प्राण वाचले. मात्र एक पाय पूर्णपणे निकामी झाला, तर दुसºया पायाचीही शस्त्रक्रिया झाली. शस्त्रक्रिया झाल्यानंतर आशुतोष काही दिवसांनी शुद्धीवर आला. त्यावेळी त्याने त्याच्यावर बीतलेल्या प्रसंगापेक्षा आता मी दहावीची परीक्षा कशी देणार? असा प्रश्न त्याने नातेवाईकासह डॉक्टरांना विचारला. परीक्षा अवघ्या दोन महिन्यांवर येऊन ठेपली आहे. मी तोपर्यंत सुधारणार का? अशी विचारणा तो डॉक्टर्ससह नातेवाईकांना विचारू लागला. खरं तर एवढ्या मोठ्या अपघातात जीव वाचला किंवा आता आपण अपंग झालो याची काळजी घेण्यापेक्षा तो दहावीची परीक्षा कशी देणार याचा जास्त विचार करू लागला. यातून त्याची जिद्द चिकाटी दिसून येत होती.आशितोष याचा अपघात ६ जानेवारी रोजी झाला. त्याच दिवशी त्याच्या पायावर शस्त्रक्रिया झाली. त्यावेळी त्याचा एक पाय पूर्णपणे निकामी झाला, तर १६ जानेवारी रोजी दुसºया पायावर मोठी शस्त्रक्रिया करण्यात आली. २२ फेब्रुवारी रोजी त्याला दवाखान्यातून घरी सोडण्यात आले. तेव्हापासून दहावीची परीक्षाही दोन महिने दूर होती. अपघातामुळे अशितोष अभ्यास करू शकला नाही. तर परीक्षेसाठीही त्याला पलंगावरून उचलून परीक्षा केंद्रावर न्यावे लागत होते. अशा परिस्थितीत आशुतोष याने दहावीची परीक्षा दिली. मात्र तरीही सोमवार, ६ मे रोजी लागलेल्या दहावीच्या सीबीएसईच्या परीक्षेत ९४.४ टक्के गुण मिळवून तो विद्यालयात दुसरा आला. खरे, तर ...जिद्द व चिकाटी असली तर, कोणत्याही संकटावर आपण मात करू शकतो. हा संदेश आशुतोषने विद्यार्थ्यांना दिल्याचे दिसून येत आहे. तर ‘देव तारी, त्याला कोण मारी’, असा प्रकारही त्याच्या अपघातातून त्याला मिळालेले जीवदान व जीवावर बेतलेले संकट पायावर गेल्याचे दिसून आले. लहान वयातच अपंगत्वावर मात करण्याची जिद्द आशुतोष् मध्ये असल्याचेही या अपघातातून दिसून आले.दरम्यान, आशुतोष गोलांडे याने अतिशय कठीण परिस्थितीत मिळवलेले यश पाहून त्याचा आज सामाजिक कार्यकर्ते प्रमोद सावकारे व सरपंच प्रवीण गुंजाळ यांनी घरी जाऊन सत्कार केला.
अपघाताने मोडून पडला कणा, तरी सोडला नाही अभ्यासाचा बाणा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 08, 2019 12:55 AM
माणसावर संकट कितीही येवो. जिद्द आणि चिकाटी असली तर त्यावर मात करता येऊ शकते, हे दहावीचा निकाल लागल्यानंतर तालुक्यातील चोरवड येथील अवघ्या सोळा वर्ष वयाच्या आशुतोष गोलांडे या तारुण्यात येणाऱ्या विद्यार्थ्याने दाखवून दिले आहे.
ठळक मुद्देआशुतोषची उल्लेखनिय जिद्ददहावीच्या सीबीएसई परीक्षेत मिळविले ९४.४ टक्के गुण