मुक्ताईनगर, जि. जळगाव : श्री संत मुक्ताबाई पालखी सोहळा सोबत पंढरपूरला गेलेले वारकरी परत येत असताना त्यांच्या उभ्या वाहनाला लक्झरी बसने मागून धडक दिल्याने ११ वारकरी जखमी झाले. हा अपघात देऊळगाव मही (जि.बुलढाणा ) येथे पहाटे साडे चार वाजेच्या सुमारास झाला.जखमींवर देऊळगाव मही येथे प्रथमोपचार करून बुलढाणा येथे पुढील उपचारासाठी हलविण्यात आले तर वाहन चालकावर जालना येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. बहुसंख्य वारकरी बºहाणपूर (मध्यप्रदेश) जिल्ह्यातील आहेत. जखमींना दवाखान्यात व इतरांना घरीच सोडण्यासाठी देऊळगाव मही येथील ग्रामस्थांनी तात्काळ सहकार्य केले. मुक्ताई संस्थानचे अध्यक्ष रवींद्र पाटील तातडीने पंढरपूर येथून देऊळगाव मही कडे रवाना झाले.या अपघातात शिवाजी सुखदेव ताट, (रा. जलचक्र ता. बोदवड), विमलबाई बाबुराव माळी (रा. खकनार ता. बºहाणपूर), शांताबाई धनसिंग पाटील (रा. मोंढावा ता. जळगाव), शेवंताबाई रामा पाटील (रा. चिंचखेड़ा, ता. जळगाव), जिजाबाई गोरेलाल ठाकूर (शिकारपुरा, बºहाणपूर), सुशीला हरिभाऊ पाटील ( खकनार ता. बºहाणपूर), रंजना बळीराम पाटील ( रुइखेड़ा ता. मुक्ताईनगर), सुनिता विलास महाजन (रा. शहापूर ता. बºहाणपूर), भारती आनिल पाटील (बेलसवाडी, ता. मुक्ताईनगर), वैशाली विजय कोडे (रा. भामलवाडी, ता. रावेर), माधुरी श्रीराम महाजन ( खकणार ता. बºहाणपूर) हे जखमी झाले.
वारीवरून परतणाऱ्या मुक्ताई पालखीतील वारकºयांच्या वाहनाला अपघात, ११ जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2018 12:50 PM