शहरं
Join us  
Trending Stories
1
"PM ज्याच्यावर घोटाळ्याचा आरोप करतात, त्याला DCM बनवतात", केजरीवाल यांचा सभागृहातून हल्लाबोल
2
मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीत ठाकरेंचाच आवाज; युवासेनेची मुसंडी, अभाविपचा धुव्वा 
3
₹272 कोटींचा प्रोजेक्ट, नितिन गडकरींनी केलं होतं भूमिपूजन; आता विरोधात उतरल्या कंगना रणौत!
4
महाराष्ट्रात हजारो जणांना ३०० कोटींचा गंडा घातला, मथुरेत साधूच्या वेशात लपला, अखेर पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
5
देवेंद्र फडणवीसांच्या कार्यालयाबाहेर तोडफोड करणारी महिला कोण? धक्कादायक माहिती समोर
6
काँग्रेसच्या १३ बंडखोर नेत्यांवर कारवाई, ६ वर्षांसाठी पक्षातून हकालपट्टी!
7
Ranbir Kapoor : वयाच्या अवघ्या १४ व्या वर्षी रणबीर कपूरने कामाला केली सुरुवात; आईला दिला पहिला पगार
8
अग्निवीरांसाठी खूशखबर; आता 'ब्रह्मोस'ही देणार नोकरीची संधी, मिळणार एवढे आरक्षण
9
वर्ल्ड कपमध्ये भारताची 'अग्निपरीक्षा', ट्रॉफी जिंकण्याचे आव्हान; कुठे पाहाल लाईव्ह सामने? जाणून घ्या सर्वकाही
10
IND vs BAN : बांगलादेशच्या चाहत्याला रुग्णालयात का दाखल करावे लागले? पोलिसांनी दिली महत्त्वाची माहिती
11
IND vs BAN: बांगलादेशच्या 'सुपरफॅन'ला मारहाण प्रकरणात मोहम्मद सिराजचं कनेक्शन काय?
12
"ना मी निवृत्त झालो आहे, ना... ", भूपेंद्र हुड्डा यांचे मुख्यमंत्रिपदाबाबत मोठं विधान
13
37 पर्यटकांनी भरलेली बस पुरात अडकली, बचावकार्यानंतर सर्वांची सुखरूप सुटका, बघा थरारक VIDEO
14
"कोण मायचा लाल माझं रेकॉर्ड मोडू शकत नाही", अजित पवार चंदगडमध्ये काय बोलले?
15
प्रेमासाठी कायपण! कायद्याचं शिक्षण घेणाऱ्या मुलाने गर्लफ्रेंडसाठी हद्द ओलांडली; पण पोलिसांना सापडला
16
तरणाबांड भारत हळूहळू वार्धक्याकडे जाऊ लागला! सरासरी वय २४ वरून २९ वर
17
Dharmveer 2 Review : 'नाथा'घरच्या 'आनंदा'ची गोष्ट! प्रसाद ओकचा 'धर्मवीर २' कसा आहे? वाचा रिव्ह्यू
18
Exclusive: रात जवां है! प्रिया बापटची नवी हिंदी सीरिज; पहिल्यांदाच साकारणार 'ही' भूमिका
19
राहुलबाबाला MSP चा फुल फॉर्म; खरीफ-रबी पिकातील फरक माहितेय का? शाहांची बोचरी टीका
20
बंदुकीचा धाक दाखवून चप्पल चाटायला लावले, टाचेखाली चिरडले, ४ जणांकडून अल्पवयीनाचं लैंगिक शोषण

जळगावात अपघात १६ टक्क्यांनी घटले; पण...

By सागर दुबे | Published: April 13, 2023 3:30 PM

गेल्या काही वर्षांपासून बेशिस्त वृत्ती, बेदरकारपणा, अतिवेग, वाहतूक नियमांचे उल्लंघन या कारणांमुळे जिल्ह्यात अपघातांचे प्रमाण वाढले होते.

जळगाव : जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्ग, राज्यमार्ग आणि इतर मार्गांवरील वाहतूक कोंडी आणि वाहतूक नियमांचा बोजवारा उडाला असताना गेल्या वर्षीच्या तुलनेत या वर्षी जानेवारी ते मार्च या तीन महिन्यांत जीवघेण्या अपघातांच्या संख्येत १६ टक्क्यांनी घट झाल्याची माहिती उपप्रादेशिक परिवहन विभागाकडून देण्यात आली आहे. त्याशिवाय जळगाव जिल्ह्यातील अपघातील मृत्यूचेही प्रमाण घटले आहे. मात्र, अपघाताची संख्या जरी घटली असली तरी नागरिकांनी वाहतूकीचे नियम पाळून वाहन चालवावे, असे आवाहन उपप्रादेशिक परिवहन विभागाकडून करण्यात आले आहे.

गेल्या काही वर्षांपासून बेशिस्त वृत्ती, बेदरकारपणा, अतिवेग, वाहतूक नियमांचे उल्लंघन या कारणांमुळे जिल्ह्यात अपघातांचे प्रमाण वाढले होते. यात नैसर्गिक कारणांपेक्षा मानवी दोषच अधिक दिसून आहेत. मागील वर्षी जळगाव जिल्ह्यात एकूण ८४३ रस्ते अपघात झाले आहेत. या अपघातांमध्ये ५६४ व्यक्तींचा मृत्यू झाला आहे तर अपघातात जखमी झालेल्यांची संख्या ७१९ इतकी आहे. परंतू, जानेवारी ते मार्च- २०२२ या कालावधीच्या तुलनेत जानेवारी ते मार्च-२०२३ या कालावधीत एकूण अपघातांच्या संख्येत १६ टक्क्यांनी घट झालेले असून अपघातातील मृत्यूची संख्येत १५ टक्क्यांनी घट झालेली पहायला मिळत आहे.

चालकांचा निष्काळजीपणा...जळगाव जिल्ह्यातील रस्ते अपघातामध्ये प्रामुख्याने दुचाकी, अवजड मालवाहू वाहन व कार यांचा समावेश आहे. सर्वाधिक अपघात चालकाच्या निष्काळजीपणामुळे होत असल्याचे महामार्ग पोलिसांच्या निदर्शनास आले आहे. ज्यामध्ये वेगाने वाहन चालविणे, हेल्मेट न लावणे, सीटबेल्ट न वापरणे, पहाटेच्या वेळी चालकांना डुलकी येत असल्याने अपघात होत आहे. वाहन चालवताना फोनवर बोलणे आणि ओव्हरटेक करण्याच्या कारणामुळेसुद्धा सर्वाधिक अपघात होत असल्याचा उपप्रादेशिक परिवहन विभागाने काढला आहे.

प्रवासी बस चालकांनी मालाची वाहतूक करू नका...खासगी प्रवासी बस चालकांनी त्यांच्या वाहनातून मालाची वाहतूक करण्यास मनाई करण्यात आली आहे. त्याशिवाय प्रवासी वाहतूक करणा-या वाहन चालकांनी आसन क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी वाहतूक करू नये, अन्यथा कारवाईला सामोरे जावे लागेल, अशा इशारा उपप्रादेशिक परिवहन विभागाने दिला आहे.

ओव्हरटेक करू नका...महामार्गावर आणि शहरात दुचाकी चालविताना न चुकता हेल्मेट परिधार करावे. सर्व वाहन चालकांनी महामार्गावर ठरवून दिलेल्या वेग मर्यादेमध्ये वाहन चालवावे. लेन बदलवितांना व ओव्हरटेक करताना विशेष काळजी घ्यावी. मुख्यत: ओव्हरटेक करूणे टाळा. तसेच वाहन चालविताना मोबाईलवर बोलणे टाळावे. दुचाकी चालकांनी ट्रीपलसीट वाहन चालवू नये. कार चालकांनी सीटबेल्टचा वापर करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

ही आहेत नैसर्गिक कारणेधुके किंवा मुसळधार पाऊस, उष्णतेमुळे टायर फुटणे, अचानक जनावर रस्त्यात आडवे येणे, दरड कोसळणे अशा कारणांमुळे अपघात होतात मात्र याचे प्रमाण कमी असून मानवी चुकाच अधिक आहेत.

सन २०२२अपघात :  ८४३मृत्यू : ५६४जखमी : ७१९

मागील वर्षीच्या तुलनेत यंदा...अपघात घट : १६%मृत्यूमध्ये घट : १५ %

टॅग्स :Accidentअपघात