टपाल खाते हायटेक : 11 जिल्ह्यांमध्ये जळगावचा समावेशजळगाव, दि. 22 - ग्रामीण माहिती संप्रेषण व तंत्रज्ञानांतर्गत टपाल कार्यालयात एमसीडी (मेन कॉम्युटिंग डीव्हाईस) या उपक्रमासाठी 11 जिल्ह्यांमध्ये जळगावाचा समावेश झाला आह़े विभागात पुणे ग्रामीण नंतर जळगाव हा राज्यात दुस:या क्रमांकाचा जिल्हा ठरणार आह़े एमसीडी मशीनच्या वापरामुळे विभाग पेपरलेस होणार असून ऑनलाईनमुळे टपाल खात्याच्या खातेदारांना जलद गतीने सेवा मिळणार आह़ेआरआयटीसी (रूरल इम्फॉरमेशन कम्युनिकेशन टेकAॉलॉजी) या अंतर्गत टपाल कार्यालयात बँकाप्रमाणे येथील खातेदाराला जलद गतीने व सहज व सुलभ सुविधा देता यावी, यासाठी एमसीडी मशीनचा वापर करण्यात येणार आह़े या योजनेच्या अंमलबजावणीसाठी औरंगाबाद प्रादेशिक विभागामार्फत 11 जिल्ह्यांची निवड करण्यात आली आह़े त्यात मराठवाडय़ातील 8 व खान्देशातील जळगाव, धुळे व नंदुरबार या तीन जिल्ह्याचा समावेश आह़े सर्वप्रथम योजनेचा प्रारंभ या 11 पैकी जळगाव जिल्ह्यातून होणार आह़े या ऑनलाईन आनुधिक प्रणालीमुळे येथील पोस्ट विभागाची सर्व शाखा ऑनलाईनव्दारे संगणकीकरणामुळे जोडल्या जाणार आहेत़असे आहे एमसीडी मशीनएमसीडी (मेन कॉम्युटिंग डीव्हाईस) मशिनमध्ये स्क्रीन टच, जीपीएस, स्मार्ट कार्ड रिडर, स्वाईप कार्ड रिडर, फिंगर प्रिन्ट स्कॅनर, 3 थ्री जी कनेक्शन अँटेना या अत्याधुनिक प्रणालींचा समावेश आह़े तसेच या मशीनला चॉजिर्गसाठी सोलर पॅनची सोय असून सौरऊर्जेवर हे मशीन चॉर्ज करता येणार आह़े मशीनव्दारे पोस्ट विभागाच्या ई मनिऑर्डर, बचतखाते, आवृत्ती जमा खाते मुदत ठेव तसेच महात्मा गांधी रोजगार अभियान या शासकीय योजनांचे अनुदानाचा, रोख रकमेचा सहज व सुलभ जलदगतीने लाभ मिळणार आह़ेप्रत्येक पोस्टाला एक मशीनया प्रणालीसाठी मुख्य पोस्ट कार्यालयातील संगणक प्रशासक प्रेमकुमार महाजन यांच्यासह पाच कर्मचा:यांचे नुकतेच प्रशिक्षण पूर्ण झाले आह़े ते महिनाभरात प्रत्येक पोस्ट विभागाच्या शाखेतील पोस्ट मास्तरला ही मशीन हाताळण्याबाबत प्रशिक्षण देण्यात येणार आह़े मक्तेदार कंपनीने यंत्रणेची जोडणी केल्यानंतर प्रत्येक शाखेला एक एमसीडी मशीन देण्यात येईल़ महिनाभराच्या काळात एमसीडी मशीनची जिल्ह्यात टप्प्या-टप्पाने अंमलबजावणी करण्यात येईल अशी माहिती संगणक प्रशासक महाजन यांनी दिली़एकाच दिवसात मनी ऑर्डरची रक्कम मिळणारसद्यस्थितीत या एमसीडी मशीनमध्ये तीन ई मनिऑर्डर, महात्मा गांधी रोजगार हमी योजना, तसेच कोअर बँकिंगमध्ये बचतखाते, आवर्ती जमा खाते, मुदत ठेव याबबतचे तीन योजनांसाठी सुविधा राहणार आह़े ऑनलाईन प्रणालीशी सर्व ग्रामीण भागातील शाखा, कार्यालये मुख्य कार्यालयाशी जोडण्यात येणार आह़े संबंधित खातेदार ग्राहकाला स्मार्ट कार्ड, स्व्ॉप कार्ड आदीव्दारे खात्यातील पैसे काढता येतील किंवा दुस:याच्या खात्यावर जमा करता येणार आह़े मनीऑर्डर मिळण्यास दोन दिवसांचा वेळ लागत होता़ या प्रणालीमुळे त्याच दिवशी संबंधिताला मनीऑर्डर तसेच इतर रकमांचा लाभ घेता येणार आह़े त्याच मिनिटाला संबंधित खातेदाराला व्यवहाराचा संदेश पाठविला जाणार आह़ेएमसीडी मशीनसाठी जळगाव जिलची निवड झाली आह़े या प्रणालीमुळे ग्रामीण भागातील सर्व शाखा, कार्यालये ऑनलाईन पध्दतीने एकमेकांशी जोडले जाणार असून ग्राहकांना जलदगतीने सुविधा मिळतील़ साधारणत: महिनाभरात या मशीनची जिलत अंमलबजावणी शक्य आह़े भविष्यात मशीनव्दारे ग्राहकाला जास्तीत जास्त लोकाभिमुख सेवा देण्याचा विभाग प्रयत्नशील आह़े- बी़डी़चव्हाण, डाक अधीक्षक
‘डीव्हाईस’मुळे टपाल खात्याच्या खातेदारांना जलद गतीने सेवा मिळणार
By admin | Published: April 22, 2017 1:25 PM