जळगाव : चाळीसगाव पोलीस ठाण्यात गुन्ह्यात न्यायालयाने ठोठावलेल्या शिक्षेविरोधात औरंगाबाद खंडपीठात अपील केले. खंडपीठाने शिक्षा कायम केल्यानंतर उर्वरीत शिक्षा न भोगता आरोपी अन्वरशहा बाबुशहा फकीर ( ६२, रा. लोंजे ता.चाळीसगाव) हा फरार झाला होता. या संशयिताने विविध ठिकाणी नावे व पत्ता बदलावून वास्तव्य करुन शोधार्थ असलेल्या स्थानिक पोलिसांसह जिल्हा पोलीस यंत्रणेला हैराण करुन सोडले होते. तब्बल सात वर्षानंतर डोकेदुखी ठरलेल्या फरार अन्वरशहा याला जळगाव स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली आहे. महिनाभर मध्यप्रदेशसह विविध जिल्ह्यात शोधार्थ भटकरणाऱ्या पथकाला अन्वरशहाच्या अटकेतसाठी कधी घरकुल योजनेच अधिकारी तर कधी फायनान्स कर्मचारी बनावे लागल्याची माहिती मिळाली आहे.आरोपी अन्वरशहा बाबुशहा फकीर यास जिल्हा न्यायालयाने चाळीसगाव पोलीस स्टेशनला दाखल न. कोर्टाने २३८/१९९८ भादवि.क.३०२,३०७,३२६ अन्वये गुन्ह्यात दोषी धरुन १ वर्ष कारावासाची शिक्षा सुनावली होती. या शिक्षेवर अन्वरशहा याने औरंगाबाद खंडपीठात अपील दाखल केले होेते. यावर खंडपीठाने अन्वरशहा फकीर याची शिक्षा कायम ठेवली होती. मात्र, शिक्षा कायम ठेवल्याच्या आदेशानंतर फकीर शहा फरार झाला होता. जिल्हा न्यायालयाने त्याचे अटक वॉरंट काढले होते. तर खंडपीठाने त्याच्या अटकेसाठी विशेष पोलीस महानिरिक्षकांना पत्रव्यवहार करुन आदेश दिले होते. त्यानुसार विशेष पोलीस महानिरिक्षक डॉ. छेरींग दोरजे यांनी पोलीस अधीक्षक डॉ. पंजाबराव उगले यांना सूचना व आदेश दिले होते.विशेष पथकाची नियुक्तीपोलीस अधीक्षक डॉ. पंजाबराव उगले यांनी अन्वरशहा यांच्या अटकेसाठी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरिक्षक बापू रोहम, सहायक पोलीस निरीक्षक राजेश शिंदे, पोहेकॉ.जितेंद्र पाटील, अनिल देशमुख, विनोद पाटील, प्रविण हिवराळे या विशेष पथकाला नियुक्त केले होते. या पथकाने मध्यप्रदेश राज्यातील नरसिंगपूर येथे जावून माहिती घेण्याचा प्रयत्न केला. माहिती मिळत नसल्याने कर्मचाऱ्यांनी फायनान्सचे कर्मचारी असल्याचे सांगितल्यावर अन्वरशहाबद्दल माहिती मिळाली होती. मात्र याठिकाणी तो मिळाला नाही. यानंतर सिल्लोड तालुक्यताील आमढाणे येथे पथक रवाना झाले. याठिकाणी माहिती मिळावी म्हणून पथकाला घरकुल योजनेचे कर्मचारी असल्याची शक्कल लढवावी लागली. मात्र यानंतरही पथकाला रिकामे हाते परतावे लागले. पथकाने महिनाभरात मध्यप्रदेशसह विविध जिल्ह्यात वाºया केल्या़अंत्ययात्रेला आला अन् पोलिसांच्या जाळ्यात सापडलाअन्वरशहा वेगळ््या-वेगळ््या ठिकाणी वास्तव्य करताना नाव, व पत्ता बदलवून राहत होता. शोध लागू नये म्हणून त्याने आधारकार्डही काढले नव्हते. तब्बल महिनाभराच्या अथक परिश्रमानंतर पथकाला ९ जानेवारी रोजी अन्वरशहा जळगावातील त्याच्या नातेवाईकाच्या अंत्ययात्रेला आला असल्याची गोपनीय माहिती मिळाली. पथकाने घटनास्थळ गाठले अन् सापळा रचून अन्वरशहाला अटक केली. सात वषार्पासून शोध लागत नसल्याने डोकेदुखी ठरलेल्या अन्वरशहाच्या अटकेनंतर पोलीस अधीक्षकांसह अधिकारी, कर्मचाºयांनी निश्वा:स सोडला. पोलीस अधीक्षक डॉ. पंजाबराव उगले यांनी आपल्या दालनात बोलावून अन्वरशहाला अटक करणाºया पथकाचे विशेष कौतूक केले.
फरार आरोपी सात वर्षांनी जेरबंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 11, 2020 12:34 PM