भुसावळ : शहरात खुनाच्या गुन्ह्यात संशयीत आरोपी असलेल्या इसमाकडे गावठी कट्टा असल्याची गोपनीय माहिती जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाल्यानंतर त्यांनी रविवारी सकाळी सापळा रचला. यानुसार सकाळी १० वाजेच्या सुमारास यावल रोडवरील महात्मा गांधी पुतळ्याजवळ संशयीत आल्यानंतर त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे गावठी कट्टा आढळल्याने त्यास अटक करण्यात आली. सदर आरोपीविरुद्ध शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. अमित नारायणसिंह परीहार (रा.नागसेन कॉलनी, भुसावळ) असे या आरोपीचे नाव आहे. संशयीत अमित परीहारकडे गावठी कट्टा असल्याची माहिती मिळाल्यानंतर रविवारी सकाळी एलसीबीच्या पथकाने सकाळी १०वाजेच्या सुमारास यावल रोडवरील राष्ट्रपिता महात्मा गांधी पुतळ्याजवळ संशयीत आल्यानंतर त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे २५ हजार रुपये किंमतीचा गावठी कट्टा आढळून आला. यांनी केली कारवाई ही कारवाई जळगाव गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक किरणकुमार बकाले यांच्या मार्गदर्शनाखाली एएसआय अशोक महाजन, हवालदार शरीफ काझी, नाईक युनूस शेख, किशोर राठोड, विनोद पाटील, रणजीत जाधव, दीपक चौधरीख हरीष परदेशी, उमेश गोसावी आदींनी केली. आरोपीविरुद्ध भुसावळ शहर पोलिसात रणजीत जाधव यांच्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला. फोटो क्रमांक १२ आणि १३
गावठी कट्ट्यासह आरोपी जाळ्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2020 7:09 PM