शहरं
Join us  
Trending Stories
1
तेल, तूप, साखर, मीठ... खच्चून महिन्याला ५०० रुपये खर्च, वर १००० उरतात; कोल्हापुरात उमेदवाराच्या सुनेचे वक्तव्य 
2
भाजपाशी मतभेद, पण कुणी बोलायला तयार असेल तर...; उद्धव ठाकरेंनी घातली साद
3
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा रद्द, पालिकेची परवानगी मिळूनही असा निर्णय का? वाचा कारण
4
जातनिहाय जनगणनेवर भाजपा आणि नरेंद्र मोंदीनी भूमिका जाहीर करावी, काँग्रेसचं आव्हान
5
भाजपाचा अमित ठाकरेंना पाठिंबा, महायुतीचे समर्थन का नाही? फडणवीसांनी काय घडले, ते सांगितले
6
कॅनडातील पंजाबी गायकांच्या भागात १०० राऊंड फायरिंग; योगायोगाने पोलिसही तिथेच अडकलेले...
7
ज्या व्हॅनने शाळेतून घरी सोडलं तिनेच चिरडलं; वडिलांच्या कुशीतच ६ वर्षीय लेकीने सोडला जीव
8
पुन्हा एकदा महागणार Vodafone-Idea चे रिचार्ज प्लॅन्स? कंपनीच्या अधिकाऱ्यानं सांगितली 'ही' बाब
9
“छत्रपती शिवरायांची मंदिरे बांधण्यापेक्षा गड-किल्ल्यांचे संवर्धन करा”; राज ठाकरे थेट बोलले
10
"...म्हणून सत्तेतील लोकांची पळापळ सुरू झालीये"; जयंत पाटलांचे महायुतीला पाच सवाल
11
शरद पवार- उद्धव ठाकरेंनी मनोज जरांगेशी बोलायला सांगितले..; असीम सरोदेंचा गौप्यस्फोट
12
Kamakhya Temple: पाळीचे ४ दिवस धर्मकार्यासाठी निषिद्ध; कामाख्या मंदिरात त्याच ४ दिवसांचा उत्सव!
13
Raj Thackeray : ‘आम्ही हे करु’! मनसेचा जाहीरनामा आला; राज ठाकरेंनी महाराष्ट्राला काय शब्द दिला? म्हणाले...
14
"अदानींच्या घरी बैठक झाली होती, त्यात…’’, अजित पवार यांच्या दाव्यानंतर शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
15
Tripuri Purnima 2024: त्रिपुरी पौर्णिमेच्या संध्याकाळी त्रिपुरी वात जाळा; महादेवाच्या कृपेने दुःख-दैन्य टाळा!
16
NTPC Green Energy चा IPO १९ नोव्हेंबरला खुला होणार, ग्रे मार्केटमध्ये स्थिती काय?
17
...तर दाढी मिशी काढून मतदारसंघात फिरेन; वडिलांच्या आठवणीत मयुरेश वांजळे भावूक
18
"यांना लाज वाटली पाहिजे"; देवेंद्र फडणवीसांचा चढला पारा, विरोधकांना सुनावलं
19
"शिंदे आणि फडणवीस यांना माहीत झाले आहे की..."; ओवेसींचा महायुतीला टोला
20
"अमित ठाकरेंना MLC ऑफर दिली, पण राज ठाकरेंनी..."; देवेंद्र फडणवीसांचा गौप्यस्फोट

अ‍ॅसिडने भरलेला टॅँकर पेटला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2019 1:07 PM

तासभर वाहतूक खोळंबली

जळगाव : मुंबईहून अ‍ॅडीस भरून नागपूरकडे जाणारा टँकर समोरून भरधाव वेगात येणाऱ्या ट्रकला वाचविताना महामार्गाच्या खाली उलटून त्याने पेट घेतल्याचा थरारक प्रकार खोटेनगरजवळ रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास घडला़ आगीचे प्रचंड लोळ, धूर व दुर्गंधीमुळे प्रचंड भितीचे वातावरण या परिसरात निर्माण झाले होते. चालक या घटनेत बचावला असून तासाभराने आग आटोक्यात आणून महामार्ग मोकळा करण्यास पोलीस यंत्रणेला यश आले़मुंबई येथील राम रतन यादव यांच्या मालकीचा (एम़ एच़ ०४ जी़ आऱ ११९२) या टँकरमध्ये मुंबई येथून २५ टन नायट्रीक अ‍ॅसीड भरून हा टँकर चालक बीरजु यादव (मूळ रा़ उत्तर प्रदेश, ह़मु मुंबई) हा घेऊन नागपूर येथे निघाला होता़ पाळधीकडून येत असताना खोटेनगरजवळ हॉटेल राधीकाच्या जवळ समोरून भरधाव वेगात येणारा ट्रक थेट टँकवर आला़ या ट्रकला वाचविताना बीरजु याने टँकरचे स्टिअरींग अगदी वेगाने डाव्या बाजुला वळविले़ यात महामार्गाच्या खाली असलेल्या मोठ्या खड्डयात हा टँकर उलटला़ टँकर उलटताच यातील अ‍ॅसीड व पेट्रोलने क्षणात पेट घेतला़ आगीने क्षणात रौद्र रूप धारण केले होते़ आगीचे प्रचंड लोळ आकाशाकडे झेपावत होते. यात टँकरचे टायर जळाल्याने तसेच अ‍ॅसीडमुळे मोठ्या प्रमाणावर दुर्गंधी व धूर पसरला होता़ दुर्गंधी इतकी प्रचंड होती की टँकरजवळ जाणेही कठीण होत होते़ नागरिकांना थांबताही येत नव्हते़ अखेर काही वेळाने तीन अग्निशमन बंबानी घटनास्थळी येऊन ही आग विझविली़तो वाचला इतरांनाही वाचविलेबीरजुु यादव हा टँकर घेऊन महामार्गावरून जात असताना अचानक एक ट्रक भरधाव वेगात त्याच्या समोर आला़ यावेळी त्याने प्रसंगावधान राखत टँंकरचा स्टेरींग डाव्या बाजुने जोरात वळविला़ यात टँकर डाव्या बाजुला खड्डयात उलटला़ त्याने तत्काळ टँकरमधून उडी घेतली़ चुकुन हा टँकर उजव्या बाजुला गेला असता तर महामार्गावर मोठी हानी झाली असती़ बीरजू या टँकरमध्ये एकटाच होता़महामार्ग तासभर ठप्पअपघात झाल्यामुळे शहरात गुजराल पेट्रोलपंपापर्यंत तर दुसºया बाजुने बांभोरीपर्यंत पूर्ण वाहतूक तासाभरासाठी ठप्प होती़ तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दिलीप भागवत, रामानंद पोलीस निरीक्षक बुधवंत, वाहतूक शाखेचे देविदास कुनगर यांच्यासह ४० ते ५० पोलीस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली होती़ तासाभराच्या परिश्रमानंतर रात्री १० .३५ वाजता वाहतूक सुरळीत करण्यात पोलीस यंत्रणेला यश आले होते़ बीर्जु यादव या घटनेत बचावला आहे़

टॅग्स :Jalgaonजळगाव