जळगाव : तापी पाटबंधारे विकास महामंडळांतर्गत बोदवड उपसा सिंचन योजनेसाठी असलेल्या ६६.६६ कोटी रुपयांच्या निधीचे वितरण वितरणास राज्यपाल सी.विद्यासागर राव यांनी मान्यता दिली. या संदर्भात जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी गुरुवारी त्यांची भेट घेतली.जळगाव जिल्ह्यासह बुलडाणा जिल्ह्यास फायदेशीर ठरणाऱ्या बोदवड उपसा सिंचन योजनेसाठी २ फेब्रुवारी १९९९ रोजी ५२२.२० कोटी किंमतीस प्रशासकीय मान्यता मिळाली होती. त्यानंतर ४ सप्टेंबर २००८ रोजी १५०८.२३ कोटी किंमतीस द्वितीय सुधारीत प्रशासकीय मान्यता मिळाली. या योजनेच्या निधीसाठी राज्य सरकारकडून केंद्राकडेही पाठपुरावा करण्यात आला. त्यानुसार २०१३-१४ व २०१४-१५साठी अनुक्रमे १२.४० कोटी व २०० कोटींची तरतूद केंद्र सरकारने अर्थसंकल्पात केली होती. या तरतुदीपैकी एक तृतीयांश म्हणजेच ६६.६६ कोटी रुपये केंद्र सरकारने महाराष्ट्र सरकारला वितरीत केले.मंजूर कामास निधीची मागणीसदर योजनेच्या टप्पा - १चे काम सुरू करण्यास ३ जानेवारी २०१७ रोजी राज्य मंत्रीमंडळाने मंजुरी दिली. त्यासाठी २०१८च्या पावसाळी अधिवेशनात पुरवणी मागणीद्वारे ६६.६६ कोटी रुपये उपलब्ध करून देण्याची विनंती नियोजन व वित्त विभागास करण्यात आली होती. त्यानंतर आता या निधीच्या वितरणास सूत्राबाहेर ठेवण्यास राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी मान्यता दिली आहे. या बाबत गिरीश महाजन यांनी राज्यपालांची भेट घेऊन चर्चा केली.सिंचन क्षेत्र वाढणारबोदवड परिसर सिंचन योजनेत जुनोने व जामठी धरण धरण बांधने अंतर्भूत असून या योजनेमुळे जळगाव जिल्ह्यातील २६ हजार ७२१ हेक्टर तर बुलडाणा जिल्ह्यातील १५ हजार ६९९ हेक्टर असे एकूण ४२.४२० हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार असल्याचे सांगण्यात आले.
जळगाव जिल्ह्यातील ‘बोदवड उपसा सिंचन’साठी ६६ कोटी निधी वितरणास मान्यता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 10, 2018 12:15 PM
गिरीश महाजन यांनी घेतली राज्यपालांची भेट
ठळक मुद्देजिल्ह्यातील २६हजार ७२१ हेक्टर क्षेत्र येणार सिंचनाखालीसिंचन क्षेत्र वाढणार