जळगाव : कोरोना बाधितांवर उपचार करण्यासाठी येथील संजीवन हार्ट हॉस्पिटल हे अत्यावश्यक बाब म्हणून अधिग्रहित करण्यात आले असून डेडिकेटेट कोविड हॉस्पिटल घोषित करण्यात आले आहे़ या रुग्णालयात आता केवळ कोरोना बाधितांवरच उपचार होणार आहेत, असे आदेश जिल्हाधिकारी डॉ़ अविनाश ढाकणे यांनी मंगळवारी काढले़जिल्ह्यात देखील गतीने पसरत आहे असे दिसून येत आहे. यामुळे संसर्ग वाढण्याची शक्यता लक्षात घेता त्यावर तत्काळ नियंत्रण करणे व विषाणू संसर्गात अधिक वाढ होऊ न देता उपाययोजना राबवणे आावश्यक असल्याचे जिल्हाधिकारी डॉ़ अविनाश ढाकणे यांनी म्हटले आहे़संजीवन हार्ट हॉस्पिटल यांनी प्रशासनाकडून वेळोवेळी निर्गमीत करण्यात येणाऱ्या सूचना निर्देश, आदेशांचे पालन करणे बंधनकारक राहील, असेही जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी कळविले आहे़-कोरोना रुग्णालयात असलेली व्यवस्था-वीस बेडचे प्रत्येकी ३ कक्ष-तीस बेडचे अत्याधुनिक आयसीयू-८ व्हँटीलेटर-संशयितांसाठी २०० बेड स्वतंत्र, प्रत्येक बेडमध्ये साडेचार फुटाचे अंतर-राजर्षी शाहू महाराज रुग्णालयात ५० बेड क्वॉरंटाईन लोकांसाठी ही व्यवस्था शासकीय पातळीवर आहे़ मात्र, संसर्ग वाढण्याची शक्यता लक्षात घेता खासगी रुग्णालये अधिग्रहित करण्याची कार्यवाही सुरू करण्यात आली आहे़