आॅनलाईन लोकमतजळगाव दि, ३० : आरटीओच्या पथकाने गुरुवारी सकाळी अचानक तपासणी मोहीम राबवून ७० रिक्षा ताब्यात घेतल्या, त्यापैकी ६१ रिक्षा नियमबाह्य असल्याने त्यांच्यावर कारवाई करण्यात आली तर उर्वरित नऊ रिक्षा सोडून देण्यात आल्या. उपप्रादेशिक परिवहन अधिकारी जयंत पाटील यांनी गुरुवारी सकाळीच शहरातील रिक्षांची तपासणी करण्याचे आदेश निरीक्षकांना दिले होते.नवीन बसस्थानक, काव्यरत्नावली चौक, शिरसोली नाका, जुने बसस्थापक यासह शहरातील अन्य गर्दीच्या तसेच मुख्य रस्त्यावर ही तपासणी मोहीम राबविण्यात आली. त्यात योग्यता प्रमाणपत्र नसणे, विमा, परवाना, गणवेश, बिल्ला व वाहन चालविण्याचा परवाना नसलेल्या ६१ रिक्षा आरटीओ कार्यालयात जमा करण्यात आल्या. दंडात्मक कारवाई करुन या रिक्षा सोडण्यात येणार असल्याचे जयंत पाटील यांनी सांगितले. काही रिक्षांचे प्रकरण न्यायालयात पाठविण्यात येणार असल्याचे ते म्हणाले.असे आहेत दंडाचे प्रकारयोग्यता प्रमाणपत्र : ४७०० रुपयेवाहन परवाना : १०००विमा : २३००गणवेश : २००बिल्ला : ३०० रुपये
जळगाव आरटीओची शहरात ६१ रिक्षांवर कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 30, 2017 9:15 PM
आरटीओच्या पथकाने गुरुवारी सकाळी अचानक तपासणी मोहीम राबवून ७० रिक्षा ताब्यात घेतल्या, त्यापैकी ६१ रिक्षा नियमबाह्य असल्याने त्यांच्यावर कारवाई करण्यात आली तर उर्वरित नऊ रिक्षा सोडून देण्यात आल्या. उपप्रादेशिक परिवहन अधिकारी जयंत पाटील यांनी गुरुवारी सकाळीच शहरातील रिक्षांची तपासणी करण्याचे आदेश निरीक्षकांना दिले होते.
ठळक मुद्देअचानक राबविली तपासणी मोहीमआरटीओ कार्यालयात जप्त केल्या रिक्षादंडात्मक कारवाई