नवीन बस स्थानक व काव्य रत्नावली चौकात वाहने थांबवून विनामास्क नागरिकांकडून ५०० रुपये प्रमाणे दंड वसूल केला. इतकेच नव्हे तर नवीन बसस्थानकात जाऊन मास्क न वापणाऱ्या पाच चालकांवरही दंडात्मक कारवाई केली. तसेच शहरातील दोन खासगी क्लासेसमध्येही जाऊन २५ विद्यार्थी विनामास्क आढळून आल्याने, त्या कोचिंग चालकांकडून ५०० रुपये दंड वसूल केला. दिवसभरात सुमारे १०५ लोकांकडून ५२ हजार ५०० रूपयांचा दंड वसूल करण्यात आला. दरम्यान, रविवारी लग्नतिथी असल्याने, शहरातील मंगल कार्यालयांमध्ये मनपाचे कर्मचारी सुट्टीच्या दिवशीही या ठिकाणी कारवाई मोहीम राबविणार आहेत. ज्या मंगल कार्यालयांमध्ये ५० हून अधिक नागरिक दिसून येतील, त्या मंगल कार्यालय मालकांवर गुन्हे दाखल करण्यात येणार अस्ल्याचे संतोष वाहुळे यांनी सांगितले.
विनामास्क असलेल्या १०५ जणांवर कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2021 4:31 AM