शहरं
Join us  
Trending Stories
1
मतांमधील तफावतीबाबत आरोपांवर निवडणूक आयोगाचं स्पष्टीकरण, म्हणाले...
2
आग्रा-लखनौ एक्स्प्रेस-वेवर भीषण अपघात, सैफई मेडिकल युनिव्हर्सिटीमधील ५ डॉक्टरांचा मृत्यू   
3
मुख्यमंत्रि‍पदाच्या स्पर्धेतून एकनाथ शिंदेंची माघार?; भाजप हायकमांडच्या भूमिकेनंतर चर्चांना उधाण
4
'बंडखोरी' रोखण्यासाठी ममता बॅनर्जींनी आपली पकड घट्ट केली; प्रत्येक नेत्याच्या जबाबदाऱ्या निश्चित केल्या
5
डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतीय वंशाच्या भट्टाचार्य यांच्यावर सोपवली मोठी जबाबदारी
6
'एक'नाथ हैं तो सेफ है' घोषणेवर भाजपचे चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले...
7
युद्ध थांबले! इस्रायल आणि हिजबुल्लामध्ये युद्धविराम, दोन्ही देशात करार झाला; वाचा सविस्तर
8
६५ टक्के आमदारांवर गंभीर गुन्हे, २७७ करोडपती; जाणून घ्या, शिक्षित आमदार किती?
9
तरुणाचा खून, ॲसिड टाकून मृतदेह फेकला; अखेर 'असा' झाला हत्या प्रकरणाचा उलगडा 
10
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
11
SIP Vs PPF Vs ELSS: ₹१.५ लाखांच्या गुंतवणुकीवर पहिलं कोण बनवेल कोट्यधीश; पाहा गणित, मिळतील ₹८.११ कोटी
12
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: प्रिय व्यक्तीच्या सहवासात रोमांचित व्हाल!
13
व्यवसाय, बंगला अन् २० एकर फार्महाऊस; मुलीनं दिली जाहिरात 'अस्सा नवरा हवा'
14
मतदान करत नाही, मग 'हे' वाचाच; स्वतंत्र वाहन, रात्रभर २५० किमी प्रवास अन् पोहोचलं एक मत..
15
निवडून येतात तेव्हा गपगार, पराभवानंतर EVM ला दाेष; काेर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं
16
कुजबुज! एका छताखाली कोणता झेंडा हाती?; पराभूत उमेदवार आता देवदर्शन करणार
17
प्रत्येक निवडणुकीनंतर EVM विरोधात घोंघावणारे हे वादळ कायमस्वरूपी शमविण्याची गरज
18
...तर महाराष्ट्रात खळबळ उडेल; उद्धव - राज यांनी एकत्र येण्याला आणखी कुठला मुहूर्त हवा?
19
गुजरात ते मुंबई प्रवासात हत्येचा थरार?; तीन वर्षांनी हत्येचा गुन्हा, तपास सुरू
20
...तोपर्यंत कांजूर डम्पिंग बंद करणे अशक्य; मुंबई महापालिका पर्यायी जागेच्या शोधात

पोलिस बंदोबस्तात वीज चोरांवर धडक कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 19, 2019 9:36 PM

तणाव : महावितरणची आतापर्यंतची सर्वांत मोठी कारवाई, १२५ हून अधिक आकोडे काढले

जळगाव : थकबाकीमुळे वीज पुरवठा खंडीत केल्यानंतरही ग्राहकांनी थेट ट्रान्सफार्मरमधूनच अवैध कनेशक्शन घेऊन वीज चोरी सुरु केल्याने महावितरणच्या अधिकाऱ्यांनी सोमवारी अचानक वाल्मिक नगरात पोलीस बंदोबस्तात कारवाईची मोहीम राबविली. यावेळी १२५ पेक्षा गास्त आकोडे काढण्यात आले. या कारवाईमुळे काही वेळ तणावाची स्थिती निर्माण झाली होती.या परिसरात मोठ्या संख्येने थकबाकीदार असल्यामुळे, महावितरणने बहुतांश ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित केला आहे. तरीही काही ग्राहकांकडून आकोडे टाकुन वीजेचा वापर सुरु होता. यामुळे महावितरणच्या अधिकाऱ्यांनी काही महिन्यांपूर्वी येथील दोनपैंकी एक ट्रान्सफार्मर कायम स्वरुपी बंद केला आहे. बोटावर मोजण्या इतकेच ग्राहक नियमित वीज बिल भरत असल्यामुळे या ग्राहकांची एकाच ट्रान्सफार्मर वीजेची जोडणी केली होती. तर आकोड्यांना प्रतिबंध घालण्यासाठी विद्युत तारांमधीलही वीज पुरवठा बंद केला आहे.त्यामुळे वीजेची चोरी करणाºया ग्राहकांनी अधिकृत ग्राहकांना दिलेल्या ट्रान्सफार्मरच्या वीज जोडणीच्या ठिकाणाहूनच बेकायदेशिरपणे चोरीचा वीज पुरवठा घेतला होता. त्यामुळे महावितरणला मोठा आर्थिक भुर्दड बसत होता.कारवाईमुळे दिवसभर तणावाचे वातावरण... पोलीस बंदोबस्तात सकाळी साडे दहाला कारवाईला सुरुवात करण्यात आल्यानंतर दुपारी बारापर्यंत चोरीचे आकोडे काढण्यात आले होते. यानंतर महावितरणच्या अधिकाºयांनी या ठिकाणी एरियल बंचची केबल टाकली. या नंतर अधिकृत ग्राहकांचा नव्याने वीज पुरवठा जोडण्यात आला. सायंकाळपर्यंत हे कामकाज सुरु होते. तो ार्यंत महावितरणचे अधिकारी व पोलिसांचा ताफा घटनास्थळीच थांबून होता. यामुळे दिवसभर या ठिकाणी तणावाचे वातावरण होते.चोरी रोखण्यासाठी टाकली एरियल बंच केबल४यावेळी महावितरणच्या कर्मचाºयांनी या ठिकाणी पुन्हा वीज चोरीचा प्रकार घडू नये, यासाठी १५० फुटापर्यंत एरियल बंचची केबल टाकली. या केबलमुळे येथील ग्राहकांना वीजेची चोरी करता येणे अशक्य आहे. तसेच या केबलमुळे अधिकृत ग्राहकानांच महावितरणकडून वीजेची जोडणी करुन देण्यात येणार आहे.

टॅग्स :mahavitaranमहावितरणJalgaonजळगाव