जळगाव : जळगाव महापालिकेच्या निवडणुकीदरम्यान कोणीही प्रलोभणास बळी पडणार याची दक्षता घेत निर्भय व पारदर्शकपणे मतदानासाठी प्रयत्न करावे अशा सूचना राज्य निवडणूक आयुक्त जे.एस. सहारिया यांनी जळगाव येथे बुधवारी केल्या. सोबतच सोशल मीडियावर अफवा पसरविणाºया तसेच प्रलोभन दाखविणाºयांवर कारवाईचा इशाराही त्यांनी दिला.जे.एस. सहारिया हे मनपा निवडणुकीच्या पूर्वतयारीचा आढावा घेण्यासाठी बुधवारी जळगावात आले. सकाळी जिल्हाधिकारी कार्यालयात सर्व निवडणूक निर्णय अधिकारी व पोलीस अधिकारी यांच्यासमवेत निवडणुकीच्या पूर्वतयारीची आढावा घेतला. त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये जिल्हाधिकारी, महानगरपालिका आयुक्त व उमविचे कुलगुरु यांच्यासमवेत निवडणुका निर्भय व पारदर्शक करण्यासाठी उपाययोजनाबाबत बैठक घेण्यात आली. या वेळी त्यांनी मतदान केंद्र, सोयी-सुविधा तसेच इतर कामांचा आढावा घेतला.
सोशल मीडियावर अफवा पसरविणाऱ्यांवर कारवाई - राज्य निवडणूक आयुक्त जे.एस. सहारिया यांचा इशारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2018 1:10 PM
जळगाव मनपा निवडणूक
ठळक मुद्दे निर्भय व पारदर्शकपणे पार पडणारउपाययोजनाबाबत बैठक