जळगाव : महापालिकेच्या आरोग्य विभागाने सुभाष चौक परिसर तसेच गांधी मार्केटमध्ये कॅरी बॅग व थर्माकॉल विक्रेत्यावर कारवाई करून विक्रेत्यास पाच हजाराचा दंड केला.भाजी विक्रेत्यांसह अन्य व्यावसायिकांकडून प्लॅस्टिक कॅरीबॅग ग्राहकांना दिली जात असल्याची तक्रार होती. याची दखल घेऊन आरोग्याधिकारी उदय पाटील आरोग्य अधीक्षक एस.बी. बडगुजर यांच्या मार्गदर्शनाखाली काही विक्रेत्यांची तपासणी केली असता त्यांच्याकडे कॅरी बॅग असल्याचे लक्षात आले. गांधी मार्केट मधील दुकान नंबर २७ रेखा आर्टस मधून धर्माकॉल जप्त करण्यात आले. एक घंटागाडीभरून थर्माकॉल जप्त करण्यात आले. या विक्रेत्यास पाच हजाराचा दंड करण्यात आला. कारवाई पथकात आरोग्य निरीक्षक एन.ई. लोखंडे, आनंद सोनवाल, पी. पवार, डी. डी. गोडाले, डॉ. कांबळे, एस. डाबोरे, विनोद पवार, बी.डी.ढंडोर यांचा समावेश होता.
जळगावात कॅरीबॅग विक्रेत्यांवर कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 13, 2018 12:15 AM