चोपडा : शहरात सर्वच मुख्य रस्ते हातगाडीधारकांनी व्यापले आहेत. त्यामुळे मुख्य रस्त्यांवर चालणेही कठीण झाले आहे. अखेर चोपडा शहर पोलिसांनी अतिक्रमित हातगाडीधारकांवर कारवाईचा बडगा उगारला.अनेकांचे वजनकाटे जप्त केले. या कारवाईमुळे मुख्य चौकांनी मोकळा श्वास घेतला आहे.शहरातील मुख्य रस्त्यावर अतिक्रमणाची गंभीर समस्या निर्माण झालेली आहे. सर्वच रस्ते हातगाडीधारकांनी व्यापल्याने, या रस्त्यांवरून चालणेही कठीण झालेले आहे. अनेकदा वाहनचालक व हातगाडीधारक यांच्यात वाद झालेले आहेत. या वादाचे पर्यवसन हाणामारीतही झालेले आहे. शहरातील रस्त्यांवरील अतिक्रमण काढण्याची जबाबदारी नगरपालिकेची आहे. मात्र ती जबाबदारी पोलिसांनी पार पाडली. शहरात पोलिसांनी रस्त्यावर हातगाडय़ा उभ्या करून व्यवसाय करणा:या जवळपास 55 हातगाडी धारकांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. या हातगाडीधारकांचे वजन काटे जप्त करून त्यांच्यावर न्यायालायमार्फत दंडात्मक कारवाई केली आहे. सर्वच हातगाडी धारकांना न्यायालयात पाठवून दंड भरल्याची पावती दाखविल्यानंतर हातकाटे परत केले जात आहेत.त्यांच्यावर झाली दंडात्मक कारवाईशिवाजी सारंग दरबारी,रवींद्र धोंडू पाटील,योगेश पांडुरंग चौधरी,हिरामण नथू पाटील,बापू महादेव बारी,टिळक दौलत महाजन,दगडू रतन माळी, संजय जगन्नाथ महाजन,राकेश राजेंद्र माळी, गणेश रमेश चौधरी,निलेश अनिल साळुंखे,विनोद सुभाष महाजन, सुशिलाबाई दिलीप महाजन,स्वप्नील वसंत चौधरी,अजहर पिरन बागवान, रिजवान इकबाल बागवान,सीताराम मायाराम माळी,लक्ष्मण माधव बारी, शेख लाजीम शेख अमिद, किरण रमेश महाजन, अज्जूबखान बिस्मिल्लखान, रोहिदास आधार माळी यांचेसह 55 हातगाडी धारकांवर कारवाई करण्यात आली. गेल्या दोन दिवसापासून मात्र रस्त्यांनी मोकळा श्वास घेतला आहे.ही कारवाई पोलीस निरीक्षक किसनराव नजन पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम, स. पो. नि. आर.एन.पवार, कांचन काळे, विजय निकम, निलेश सोनवणे, प्रवीण मांडोळे, प्रकाश मथुरे, संजय पाटील, आर.सी.बी.चे कर्मचारी कारवाईत सहभागी झाले होते. (वार्ताहर) हातगाडी धारकांचे अतिक्रमण वाढत चालले होते. शहरातील रस्ते आधीच अरुंद असतांना हातगाड्यांमुळे वाहतुकीला मोठा अडथळा होत असतो. म्हणून अतिक्रमण करणा:या हातगाडय़ांवर कारवाई करण्यात आली. रहदारीचे रस्ते मोकळे करण्यात आले.ही मोहीम कायम सुरू ठेवणार आहे.- किसनराव नजनपाटील, पोलीस निरीक्षक, चोपडा
अतिक्रमित हातगाडीधारकांवर कारवाई
By admin | Published: February 09, 2017 11:32 PM