जळगाव : कोरोना विषाणूच्या संसगार्मुळे जगभरामध्ये मोठया प्रमाणावर मनुष्यहानी झालेली असून लाखो लोक बाधीत झालेले आहे. होमिओपॅथी औषधामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते असे सांगितले जात असल्याने मोठ्या प्रमाणावर या औषधाचा खप वाढलेला आहे. या संधीचा गैरफायदा घेवून काही मेडिकल स्टाअर्सधारकांकडून या औषधी किंमतीपेक्षा अधिक दराने विक्री करीत आहेत़ त्यामुळे आता अधिक दराने या औषधांची विक्री करताना कुणी आढळून आल्यास संबंधितावर कारवाईचा बडगा उगारण्यात येईल, अशी माहिती जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती तथा परिस्थिती नियंत्रक गोरक्ष गाडीलकर यांनी दिली आहे़या औषधाचा तयार करण्याचा खर्च, वाहतूक खर्च व इतर अनुंषगीक खर्च कमीत कमी नफा विचारात घेता ८० ते १०० गोळ्या असलेली एक बॉटल ही जास्तीत जास्त ११ रुपयांपर्यंत विक्री करणे अपेक्षित आहे. मात्र, या औषधाचा खप वाढल्यामुळे काही मेडिकल स्टोअर्स व डॉक्टरांकडून अधिक किंमतीचे त्या औषधीची व्रिकी केली जात आहे़ त्यामुळे सार्वजनिक आरोग्याचा व सामाजिक बांधिलकीचा विचार करता सर्व मेडीकल स्टोअर्स आणि होमीओपॅथीची प्रॅक्टीस करणारे डॉक्टर्स यांनी अर्सेनिक अल्बम-३० या औषधाच्या एका बॉटलची किंमत ही ११रुपयांपेक्षा जास्त आकारु नये, अशा सूचना करण्यात आल्या आहेत़अन्यथा होणार कारवाईदरम्यान, जे मेडिकल स्टोअर्स चालक आणि होमीओपॅथी डॉक्टरर्स ११ पेक्षा जास्त किंमत आकारतील त्यांचेवर भारतीय साथरोग नियंत्रण अधिनियम १८९७, आपत्ती व्यवस्थापन कायदा-२००५ आणि भारतीय दंडविधान संहिता १८६० मधील तरतुदीनुसार कारवाई करण्यात येईल, असेही गोरक्ष गाडीलकर यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.
औषधांची अधिक दराने विक्री केल्यास कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2020 8:58 PM