ऑनलाईन लोकमत
जळगाव,दि.13 : जिल्ह्यात दररोज 5 ते 6 अपघात होतात व त्यात किमान एका व्यक्तीचा जीव जातो. वाढते अपघात ही चिंताजनक बाब असून ते रोखण्यासाठी पोलीस, आरटीओ व सामाजिक संस्थेच्या माध्यमातून आराखडा तयार केला जात आहे. सायबर गुन्ह्यांचेही प्रमाण वाढले आहे. हे गुन्हे रोखण्यासाठी जनजागृतीची गरज आहे. अभियांत्रिकीच्या विद्याथ्र्याची मदत घेवून शाळा, महाविद्यालय व सोसायटय़ांमध्ये मोबाईल व लॅपटॉप हाताळण्याबाबत जनजागृती केली जाणार असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक दत्तात्रय कराळे यांनी दिली.
कराळे यांनी ‘लोकमत’ कार्यालयाला सोमवारी सदिच्छा भेट दिली. यावेळी ‘लोकमत’चे निवासी संपादक मिलिंद कुलकर्णी व वरिष्ठ महाव्यवस्थापक प्रवीण चोपडा यांनी त्यांचे स्वागत केले. कराळे यांच्याशी झालेली चर्चा प्रश्नोत्तर स्वरुपात अशी..
प्रश्न : पोलीस अधीक्षक म्हणून आपण कोणत्या विषयाला प्राधान्य देणार?
कराळे : जळगाव जिल्ह्यात रुजू झाल्यानंतर अपघाताच्या घटनांनी मन सुन्न झाले. दिवसाला 5 ते 6 अपघात होतात व त्यात किमान एक बळी जातो. त्यामुळे अपघात रोखणे यालाच प्रथम प्राधान्य दिले आहे.ज्या ठिकाणी दोन किंवा त्यापेक्षा जास्त अपघात झाले आहेत अशा ठिकाणांचे पोलीस, आरटीओ व सामाजिक संस्थेच्या माध्यमातून एकत्रित सव्र्हेक्षण केले जाणार आहे.
प्रश्न : जिल्ह्यातील वाढते अपघात कसे रोखणार?
कराळे : तिन्ही यंत्रणाच्या अहवालावर उपाययोजना केल्या जातील. मुंबई येथील सामाजिक कार्यकर्ते विनय मोरे यांना जळगावात बोलावले जाणार आहे. मोरे यांचा अपघाताच्या बाबतील गाढा अभ्यास आहे. अपघात कसे होतात, ते रोखण्यासाठी काय केले पाहिजे, अपघातात जीव कसे वाचविता येवू शकतात याबाबत ते शाळा, महाविद्यालयात जावून सादरीकरण करतील. त्यामुळे 20 टक्के अपघात रोखता आले तरी हेतू साध्य होईल.
प्रश्न : सायबरचे गुन्हे रोखण्यासाठी काय उपायोजना करणार?
कराळे : सायबरचे गुन्हे रोखण्यासाठी शाळा, महाविद्यालय, कार्पोरेट कार्यालय, कंपन्या व सोसायटींमध्ये जावून मोबाईल व लॅपटॉप वापरावर जनजागृती केली जाईल. अभिया¨त्रकीच्या विद्याथ्र्याची यात मदत घेतली जाईल. त्याला काय प्रतिसाद मिळाला त्यानंतर पुढची दिशा ठरविली जाईल. सूचनांचेही आम्ही स्वागत करु.
महिलांवरील अन्याय व अत्याचाराच्या गुन्ह्यांबाबत प्रबोधन करणार
महिलांवरील अन्याय व अत्याचाराचे गुन्हे तसेच अल्पवयीन मुली पळून जाण्याचे प्रमाण जळगाव जिल्ह्यात सर्वाधिक आहे. काही गुन्हे सूड भावनेतून दाखल होत असल्याचेही लक्षात आले आहे.
महिला व मुलींच्या या गुन्ह्यांबाबत वेगवेगळ्या क्षेत्रातील लोकांची मदत घेवून समाजात परिवर्तन केले जाईल, असेही जिल्हा पोलीस अधीक्षक दत्तात्रय कराळे म्हणाले.
प्रश्न : जिल्हा पोलीस दलात मनुष्यबळाची अडचण आहे का?
कराळे : शंभराच्या जवळपास जागा रिक्त आहेत. भरतीतून काही जागा भरल्या जातील. महिलांचे प्रमाण कमी असल्याने या गॅङोटमध्ये मोठय़ा पोलीस स्टेशनला 7, तालुकास्तरावर 5 व लहान पोलीस स्टेशनला 3 महिला कर्मचारी दिलेल्या आहेत. शिवाय लहान पोलीस स्टेशनला 30 कर्मचारी देण्यात आले आहेत.