==============
हनुमान जयंती साजरी
जळगाव : पिंप्राळा येथील केसरीनंदन हनुमान मंदिरात मंगळवारी साधेपणाने हनुमान जयंती साजरी करण्यात आली. सकाळी ६ वाजता आरती व जन्मोत्सवाचा कार्यक्रम मंदिरात पार पडला. मंदिरावर आकर्षक रोषणाई करण्यात आली होती, तर हर्षल महाजन या विद्यार्थ्याने हनुमंताचे चित्र मंदिरात रेखाटले होते. ते सर्वांचे लक्ष वेधून घेत होते. कोरोनाचे संकट दूर व्हावे, अशी प्रार्थना करण्यात आली.
=============
मयूर कॉलनीतील बाजार हटविला
जळगाव : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आठवडी बाजारांना बंदी घातली आहे. मात्र, बुधवारी पिंप्राळ्यातील आठवडे बाजार विक्रेत्यांनी पिंप्राळ्यातीलच मयूर कॉलनीत बाजार भरविला होता. ही माहिती मिळाल्यानंतर मनपाचे पथक त्याठिकाणी दाखल झाले होते. त्यांनी विक्रेत्यांवर कारवाई करीत भाजीपाला जप्त केला. नंतर तेथून त्यांना हटविण्यात आले. एकीकडे प्रशासन संसर्ग कमी करण्यासाठी प्रयत्न करीत असताना, दुसरीकडे काही नागरिकांकडून मात्र नियमांचे उल्लंघन होत असताना दिसून येत आहे.