यावेळी जिल्हा उपनिबंधक संतोष बिडवई, उप जिल्हाधिकारी तुकाराम हुलवळे, पणन महासंघाचे विभागीय व्यवस्थापक आर. डी. होले, उप व्यवस्थापक ए. बी. निकम, जामनेर कृषि उत्पन्न बाजार समितीचे सचिव प्रसाद पाटील, जळगावचे आर. के. पाटील, पारोळाचे आर. डी. चौधरी, चोपडाचे एन. आर. सोनवणे, सीसीआयचे सहायक प्रबंधक दिनेशकुमार, केंद्र प्रभारी प्रमोद पाटील यांचेसह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी कृषि उत्पन्न बाजार समित्या या शेतकऱ्यांच्या हितासाठी आहे. त्यामुळे किमान आधारभूत दराने कापूस खरेदी प्रक्रिया राबवितांना शेतकरी हितास प्राधान्य द्यावे. कापूस खरेदी केंद्रावर खरेदी करतांना शेतकऱ्यांचा कापूस कमीत कमी वेळात घेता येईल, यासाठी नियोजन करावे. शेतकऱ्यांना खरेदीचे टोकन देताना त्याचे चित्रीकरण करणे आवश्यक आहे. जेणेकरुन कोणत्याही प्रकारच्या तक्रारी येणार नाही. कापूस खरेदी केल्यानंतर शेतकऱ्यांना आठ दिवसात त्यांची रक्कम खात्यावर जमा करण्यासाठी आवश्यक ते नियोजन करावे. यासाठी शेतकऱ्यांचे बँकखाते आधार लिंक असणे आवश्यक असल्याची जाणीव शेतकऱ्यांना करुन द्यावी. खरेदीची प्रक्रिया राबविताना शासनाने दिलेल्या आदेशांचे तंतोतंत पालन होईल याची सर्व केंद्रावर खबरदारी घेण्याच्या सुचनाही जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या.
भविष्यात खरेदी केलेला कापूस ठेवण्यासाठी गोडवूनची अडचण येण्याची शक्यता वर्तविण्यात आल्याने, यासाठी बुलढाणा अर्बनच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करणार असल्याचेही जिल्हाधिकाऱ्यांनी या बैठकीत सांगितले.
इन्फो :
जिल्ह्यात ३४ केंद्रावर कापसाची खरेदी :
या बैठकीत सीसीआय व कापूस पणन महांसघामार्फत जिल्ह्यातील १० तालुक्यात एकूण ३४ केंद्रांवर कापूस खरेदी सुरु असून आतापर्यंत सीसीआयच्या ११ केंद्रावर ३६५४ शेतकऱ्यांचा १ लाख ४० हजार ९३९ क्विटंल कापूस खरेदी केला आहे. अशी माहिती जिल्हा उपनिबंधक संतोष बिडवई यांनी बैठकीत दिली.