जळगाव : जिल्ह्यात सक्रिय रुग्णांमध्ये काहीशी वाढ नोंदविण्यात येत असली तरी यात लक्षणे असलेल्या रुग्णांची संख्या मात्र, घटत असून गंभीर रुग्णही कमी झाल्याचे एक दिलासादायक चित्र गेल्या चार ते पाच दिवसांपासून समोर आले आहे. दरम्यान, मंगळवारी सलग दुसऱ्या दिवशी जळगावा शहरात शंभरापेक्षा कमी रुग्णसंख्या नोंदविण्यात आली आहे. शहरात ६९ नवे रुग्ण आढळले असून ९९ रुग्ण बरे झाले आहेत.
शहरात दोन बाधिातंच्या मृत्यूची नोंद झाली आहे. जिल्ह्यातील मृतांची संर्ख्याही कमी हात असल्याचे चित्र आहे. जळगाव ग्रामीण मध्येही दोन बाधितांचा मृत्यू झाला आहे. यासह यावल, पाचोरा, मुक्ताईनगर या ठिकाणी प्रत्येकी २ तर भडगाव, चाळीसगाव, एरंडोल, रावेर तालुक्यात प्रत्येकी १ बाधिताच्या मृत्यूची नोंद झाली आहे. दरम्यान, चोपडा वगळता अन्य सर्व तालुक्यांमध्ये शंभरपापेक्षा कमी रुग्ण आढळून आले आहेत. चोपडा तालुक्यात १०७ बाधित आढळून आले आहेत.
गेल्या चार दिवसातील रुग्णांची स्थिती
७ मे
लक्षणे असलेले रुग्ण : २४५०
ऑक्सिजनवरील रुग्ण : १२३८
आयसीयूतील रुग्र्ण : ७४५
८मे
लक्षणे असलेले रुग्ण : २४३४
ऑक्सिजनवरील रुग्ण : १२६६
आयसीयूतील रुग्र्ण : ७३३
९ मे
लक्षणे असलेले रुग्ण : २३७५
ऑक्सिजनवरील रुग्ण : १३४७
आयसीयूतील रुग्र्ण : ७१३
१० मे
लक्षणे असलेले रुग्ण : २३२७
ऑक्सिजनवरील रुग्ण : ११९३
आयसीयूतील रुग्र्ण : ६९२
गेल्या महिन्यातील स्थिती
१० एप्रिल
सक्रिय रुग्ण ११७४०
लक्षणे असलेले रुग्ण ३४५६
ऑक्सिजनवरील रुग्ण १४९१
आयसीयूतील रुग्ण : ६२६
१५ एप्रिल
सक्रिय रुग्ण : ११३२९
लक्षणे असलेले रुग्ण ३३६४
ऑक्सिजनवरील रुग्ण १५०७
आयसीयूतील रुग्ण ७७४
२० एप्रिल
सक्रिय रुग्ण : १११३२
लक्षणे असलेले रुग्ण: ३४७१
ऑक्सिजनवरील रुग्ण १५६८
आयसीयूतील रुग्ण : ८३२