भुसावळ : रविवारी आलेल्या अहवालानंतर भुसावळ शहरातील कोरोनाबाधीतांची संंख्या एकवरुन दोन इतकी झाली आहे. समतानगरातील एक महिला शनिवारी कोरोना पॉझिटिव्ह निष्पन्न झाली होती तर रविवारी सिंधी कॉलनी परिसरातील एक ५० वर्षीय एक जण पॉझीटीव्ह असल्याचे स्पष्ट झाले. यामुळे सिंधी कॉलनी परिसरही सील केला आहे.या ५० वर्षीय रुग्णास चार ते पाच दिवस शहरातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, डॉक्टरांच्या सल्ल्याने त्यास जिल्हा रुग्णालयात रवानगी करण्यात आली होती. अहवाल आल्यावर संपुर्ण परिसर सॅनिटराइज करण्यात येऊन, जामनेर रस्त्यावरील सिंधी कॉलनी परिसराचे प्रवेशद्वारच सील करण्यात आले आहे.दरम्यान शनिवारी महिलेचा अहवाल पॉझीटीव्ह आल्याावर प्रशासनाने तिचा पती व मुलांसह संपर्कातील १३ जणांंना जिल्हा रुग्णालयात तपासणीसाठी पाठवले होते. त्यातील त्यातील ९ जणांना होम क्वारंटाइन करण्यात येऊन महिलेच्या पती, मुलांसह डॉक्टर आणि रिक्षाचालकास विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे. तर शनिवारी रात्रीपासून १४ दिवस समतानगर परिसर सील करण्याचा निर्णय घेण्यात आला.गांधी पुतळ्यापासून ते कंडारी पर्यंत दीड किलोमीटरचा परिसर १४ दिवसा पर्यत सील करण्यात आला आहे. केअर कमिटीची मिटिंग घेण्यात आली. यानुसर सकाळी साडेसात वाजेच्या सुमारास समता नगर भागातील रहिवाशांचे घरोघरी जाऊन सर्व्हे सुरु केला. सिंधी कॉलनीतही सर्व्हे सुरु केला जात आहे.तेरा जणांचा परिवारसिंधी कॉलनीतील या रुग्णाचा पान मसाला विक्रीचा व्यवसाय होता. त्यांच्या परिवारात तीन भाऊ, त्यांच्या पत्नी, प्रत्येकी दोन मुले आणि आई असा मोठा एकत्र परिवार आहे. त्यामुळे या रुग्णाचा अहवाल पॉझिटीव्ह आल्यानंतर परिवारातील सदस्यांना वैद्यकिय तपासणीसाठी पाठविले असल्याचे सूत्रांनी सांगितले.
भुसावळला आणखी एकाची भर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2020 10:35 PM