जळगाव : राज्यासह जळगाव जिल्ह्यातही कोरोना विषाणून अक्षरश: थैमान घातले आहे. कोरोना बाधित रूग्णांची संख्या ही दिवसेंदिवस वाढत चालली असून शनिवारी जिल्ह्यात तब्बल 44 व्यक्तींचे तपासणी अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत.पॉझिटिव्ह आढळलेल्या व्यक्तींमध्ये जळगाव शहरातील ०५, भुसावळ ०५, अमळनेर १०, चोपडा ०९, धरणगाव ०४, एरंडोल ०१ तसेच जामनेर ०२, रावेर ०६, चाळीसगाव ०२ रुग्णाचा समावेश आहे. जिल्ह्यात आतापर्यंत कोरोना बाधित रूग्णांची संख्या १ हजार १ इतकी झाली आहे, अशी माहिती जिल्हा प्रशासनाच्यावतीने देण्यात आली आहे. कोरोना बाधितांची संख्या ही हजारावर गेलेली असता, त्यात बरे होण्याचे प्रमाणाही समाधानकारक आहे़
जिल्ह्यात आणखी ४४ कोरोना बाधित रूग्णांची भर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 06, 2020 4:29 PM