आॅनलाईन लोकमत जळगाव दि १४, : मनोज लोहार खंडणी प्रकरणात बुधवारी न्या.पी.वाय.लाडेकर यांच्या न्यायालयात संशयित आरोपी उपनिरीक्षक विश्वास निंबाळकर यांच्यातर्फे अॅड.आर.के.पाटील यांनी फिर्यादी डॉ.उत्तमराव महाजन यांचा मुलगा मनोज महाजन याची उलटतपासणी घेतली. त्यात घटनेच्या आधी उपनिरीक्षक निंबाळकर यांना आपण कधीच पाहिले नव्हते असे स्पष्ट केले.नागपुर येथे संस्थेच्या कामानिमित्त गेलो होते. त्यावेळी वडीलांना डांबून ठेवले असल्याची माहिती मिळाली. चाळीसगाव येथे आल्यानंतर वडीलांना येवले यांच्या घराच्या गच्चीवर थांबवून ठेवलेले होते. याठिकाणी गेल्यावर उपनिरीक्षक निंबाळकर दिसले. निंबाळकर यांना यापूर्वी कधी पाहिले होते का? व तेच निंबाळकर आहेत हे कशावरुन ओळखले असे उलटतपासणीत वकीलांनी विचारले असता त्यांना कधीच पाहिले नव्हते. सोबत असलेल्या सहकाºयांनी त्यांची माहिती दिल्याचे मनोजने सांगितले.उलटतपासणीत मनोजला खरोखर नागपूर येथे गेला होता का?, कशाने गेला, रेल्वेचे आरक्षण केले होते का? नागपूरला कुठे थांबला याची माहिती विचारली. यावेळी न्यायालयात मनोज लोहार व धीरज येवले हजर होते. १७ फेब्रुवारी रोजी महाजन यांच्या संस्थेचा कर्मचारी नितीन सुखदेव महाजन यांची साक्ष होणार आहे.
अपर पोलीस अधीक्षक मनोज लोहार खंडणी प्रकरणात जळगावात साक्षीदाराची उलट तपासणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2018 11:12 PM
मनोज लोहार खंडणी प्रकरणात बुधवारी न्या.पी.वाय.लाडेकर यांच्या न्यायालयात संशयित आरोपी उपनिरीक्षक विश्वास निंबाळकर यांच्यातर्फे अॅड.आर.के.पाटील यांनी फिर्यादी डॉ.उत्तमराव महाजन यांचा मुलगा मनोज महाजन याची उलटतपासणी घेतली. त्यात घटनेच्या आधी उपनिरीक्षक निंबाळकर यांना आपण कधीच पाहिले नव्हते असे स्पष्ट केले.
ठळक मुद्दे मनोज लोहार, धीरज येवले हजर१७ फेब्रुवारीला होणार कामकाज घटनाक्रम उलगडला