काय वाचते आहेस? अरे लेट इट स्नो आहे, छान कथा आहेत. जमलं तर नक्की वाच. मी काय वेडा आहे का? असली पुस्तकं वाचायला. बघ अगदीच छान असेल ना तर नक्की त्यावर कुणी तरी सिनेमा वगैरे काढला असेलच डायरेक्ट तोच बघेल ना. हा मला साधारणपणे ऐकायला मिळणारा कॉलेजच्या मुलामुलींचा संवाद. त्यात कुणी वाचन, अभिवाचनाचं नाव काढलं तर कारलं खाल्यासारखा चेहरा व्हायचा. मग कधीतरी आपल्या लाडक्या कलाम सरांच्या स्मृती जतन करण्याच्या उद्देशाने 15 ऑक्टोबर हा त्यांचा जन्मदिवस वाचन प्रेरणादिन म्हणून साजरा करा, असा सरकारी आदेश येतो. सरकारी दिवस-सण साजरे केले जातात तसं या दिवसाचं होऊ नये, अशी साधारण आमची अपेक्षा असते. उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचा विद्यार्थी विकास विभाग हा वैविध्यपूर्ण उपक्रम आयोजित करणारा विभाग. विद्याथ्र्याचा सांस्कृतिक व बौद्धिक विकास व्हावा म्हणून चांगल्या कार्यक्रमाचा आमचा शोध चालू होतो. शालेय व महाविद्यालयीन विद्याथ्र्यांमध्ये वाचनाची प्रेरणा निर्माण करण्यासाठी व वाचनाची आवड वृद्धिंगत व्हावी या दृष्टीने विविध उपक्रम डोळ्यासमोर येतात. यात प्रामुख्याने नाव समोर आलं ते परिवर्तनच. जळगाव शहर ज्ञानाने, विज्ञानाने सांस्कृतिक दृष्टय़ा विकसित व्हावं या उद्देशाने परिवर्तन विविध कार्यक्रमांचं आयोजन करीत असतात. साहित्य, नाटय़, शिल्प, चित्रकला अशा विविध कलांनी समृद्ध होता यावं यासाठी परिवर्तन सातत्याने कार्य करीत असतं. निवडण्यात आलेली पुस्तकं होती, पथेर पांचाली (मूळ लेखक : बिभूतिभूषण बंद्योपाध्याय, दिग्दर्शन : होरील्सिंग राजपूत) आणि प्रेमातून प्रेमाकडे (लेखिका : अरुणा ढेरे, दिग्दर्शन : मंजुषा भिडे). नव्वद वर्षापूर्वी प्रकाशित झालेली आणि दुसरी अगदी आत्ता दोन वर्षापूूर्वीची. तिस:या दिवशी प्रेम कुणावर करावं (कुसुमाग्रज आणि इतर कवींच्या कवितावाचन, दिग्दर्शन : हर्षल पाटील) हा विषय घेऊन गाजलेल्या कवींच्या कविता त्यात कुसुमाग्रज, विंदा अगदी कोलटकरांपयर्ंत. साधारण अभिवाचन, काव्यवाचन म्हटलं की सादर करणारे आणि श्रोते म्हणून इतर सादरकर्ते एवढेच असतात. म्हणून फार प्रतिसाद मिळेल की नाही असा आमचा कयास. भीत भीत का होईना, पहिल्या दिवशी हा काय प्रकार आहे? पाहायला आलेले, असा साधारण 80 टक्के सिनेट हॉल भरला. 90 वर्षापूर्वीची गोष्ट विशीतले तरुण मंत्रमुग्ध होऊन ऐकूलागले होते. काहीतरी भन्नाट ऐकतोय, इतकं जुनं पुस्तकंही समकालीन वाटावं, ही फेसलेस आत्या, काकू, आजी आपल्या आजूबाजूला वावरतात वगैरे प्रतिक्रिया विद्याथ्र्यांकडून मिळू लागल्या. पुढचे दोन्ही दिवस हॉल अपुरा पडला, मुलं-मुली दिवाळीची सुट्टी म्हणून घरी पळून न जाता खुच्र्याच्या मधल्या पाय:यांवर दाटीवाटीने बसलीत. शेवटच्या दिवशी तर कविता म्हटल्यावर तरुणांची गर्दी न होती तर नवलच.
तरुणांना पुस्तकांशी मैत्री करायला लावणारा अभिवाचन महोत्सव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 27, 2017 1:16 AM