शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमित ठाकरेंना MLC ऑफर दिली, पण राज ठाकरेंनी..."; देवेंद्र फडणवीसांचा गौप्यस्फोट
2
अमित ठाकरेंची कोंडी? सदा सरवणकर थेट पंतप्रधान मोदींना भेटले; वाकून नमस्कार केला अन्...
3
“राजकारण आम्हालाही येते, देवेंद्र फडणवीस गोंधळलेत, उगाच नाक खुपसू नये”; संजय राऊतांची टीका
4
"शरद पवारांच्या त्या पत्रामुळेच २०१९ मध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली", देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट
5
जया बच्चन यांना हसताना पाहून नेटकरी चकित, आगामी सिनेमाच्या पोस्टरमध्ये वेगळाच लूक
6
अबब! इतक्या मिनिटांचा असणार 'पुष्पा २'चा ट्रेलर; सिनेमाच्या टीमने दिली मोठी माहिती
7
Zomato १ अब्ज डॉलर्सचा QIP लाँच करण्याची शक्यता, पाहा काय आहे कंपनीचा प्लान?
8
Maharashtra Election 2024 Live Updates: निवडणूक अधिकाऱ्यांकडून प्रकाश आंबेडकर यांच्या बॅगची तपासणी
9
'प्रथम महाराष्ट्र, मग पक्ष, शेवटी स्वतः!' केवळ उक्ती नव्हे, कृतीतून सिद्ध करणारे देवेंद्र फडणवीस
10
आधी ‘बटेंगे तो कटेंगे’ला विरोध, आता मोदींच्या सभेला दांडी, अजित पवारांच्या मनात चाललंय काय?  
11
IND vs SA: मालिका जिंकण्यासाठी मोठा निर्णय? Rinku Singh संघाबाहेर, 'या' स्टार खेळाडूला संधी
12
निवडणुकीनंतर पवार-शिंदे एकत्र आलेले दिसतील का?; 'लोकमत'च्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
13
विशेष लेख: गणिते बिघडली, झोप उडाली.. युती की आघाडी?
14
पोलिसांनी शूटरलाच विचारले ‘कोणाला पाहिलं काय?’; बाबा सिद्दिकी प्रकरणातील धक्कादायक माहिती उघड
15
गजकेसरी योगात सूर्य-शनी गोचर: ७ राशींना अनुकूल, सकारात्मक काळ; लक्ष्मी कृपा अन् यश प्रगती!
16
आजचे राशीभविष्य - १५ नोव्हेंबर २०२४, प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल, नोकरीत वरिष्ठ खुश राहतील
17
तरुणीने बोलावले म्हणून लॉजवर गेला; मात्र नंतर तरुणासोबत घडला धक्कादायक प्रकार!
18
अग्निशमन दलातील माणसांचं वेदनादायी आयुष्य! 'अग्नी'चा ट्रेलर; जितेंद्र जोशी-सई ताम्हणकरची खास भूमिका
19
... म्हणून मोदी सरकारला आहे सरकारी कंपन्यांचा अभिमान, जाणून घ्या गेल्या ९ वर्षांत किती झाली प्रगती
20
सोयाबीनला सहा हजाराचा हमीभाव देणार; PM मोदींची मोठी घोषणा

पदासाठी नाही, तर जनेतेचे आशीर्वाद घेण्यासाठी जन आशीर्वाद यात्रा - आदित्य ठाकरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2019 6:20 PM

पाचोऱ्यातून यात्रेला प्रारंभ

पाचोरा : ही 'जन आशीर्वाद यात्रा' जनता जनार्दनाचे आशीर्वाद घेण्यासाठीच असून ही माझ्यासाठी तीर्थयात्राच आहे. देवाच्या रूपानं तुम्ही मला आशीर्वाद द्या, मी कोणत्याही पदासाठी यात्रा काढलेली नाही, असे प्रतिपादन युवासेनाप्रमुख व शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे यांनी पाचोरा येथे जन आशीर्वाद यात्रेच्या शुभारंभ प्रसंगी जाहीर सभेत केले.शिवसेनेतर्फे आदित्य ठाकरे यांच्या संकल्पनेतून संपूर्ण महाराष्ट्रभर जनता जनार्दनाचे आशीर्वाद घेण्यासाठी तसेच लोकसभा निवडणुकीत ज्यांनी युतीला मतदान केले त्यांचे आभार मानने व ज्यांनी मतदान केले नाही त्यांची मने जिंकण्यासाठी या जन आशीर्वाद यात्रेचे आयोजन केले आहे. या यात्रेचा शुभारंभ गुरुवारी दुपारी पाचोरा येथून नारळ वाढवून करण्यात आला.यावेळी आपल्या अवघ्या १३ मिनिटाच्या भाषणात आदित्य ठाकरे यांनी स्पष्ट केले की , ही यात्रा निवडणुकीसाठी नसून मी कोणत्याही पदासाठी यात्रा काढलेली नाही. मला नवा महाराष्ट्र घडवायचा असून जनता जनार्दनाचे आशीर्वाद घेऊन संवाद साधायचा आहे. यासाठीच पाचोरा या बालेकिल्यातून शुभारंभ करीत आहे. घराघरात, शेतात, बांधावर शाळा, कॉलेज, चौकाचौकात जाऊन मतदारांचे आभार मानायचे असून नव्या मतदारांना जोडायचे आहे. खरी ताकद जनता जनार्दन असून राज्यात रोज नव्या समस्या उद्भवतात. त्यासाठी शिवसेनेची विचारधारा ही मदतीला धावून जाण्याची आहे. त्यासाठी शिवसैनिकांनी सदैव तत्पर रहायचे आहे,असा संदेश ठाकरे यांनी दिला.राज्याचे नेतृत्व आदित्य ठाकरे यांनीच करावं -संजय राऊतया जन आशीर्वाद यात्रेची सुरुवात पाचोºयातून करण्यामागे इतिहास आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी देखील पाचोºयातून प्रचाराची सुरुवात करीत परिवर्तन घडविले, म्हणूनच पाचोºयातून शुभारंभ करीत इतिहासात नोंद केली जाईल, असे सांगत महाराष्ट्राची भावना आदित्य ठाकरे यांनाच मुख्यमंत्री करण्याची असल्याचे प्रतिपादन खासदार संजय राऊत यांनी केले.प्रास्ताविकात आमदार किशोर पाटील यांनी सांगितले की, पाचोरा- भडगाव मतदारसंघात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या पदस्पशार्ने परिवर्तन झाले असून सर्वच ठिकाणी भगवा आहे. या यात्रेचा शुभारंभ पाचोºयातून होत असल्याचा अभिमान असून मुख्यमंत्र्यांच्या व इतर मंत्र्यांच्या सहकार्याने मतदारसंघात सहाशे कोटींची विकास कामे केल्याचा लेखाजोखा मांडला.जनतेला घातला साष्टांग नमस्काररणरणत्या उन्हात पाचोरा येथील संभाजी महाराज चौकाशेजारील कृष्णाजी मैदानावर भर दुपारी १२.३० ची नियोजित सभा दीड तास उशीरा सुरु झाली. ग्रामीण भागातून शिवसैनिक, महिला आघाडी, नागरिक, हजारोंच्या संख्येने उपस्थित होते. यावेळी भडगाव येथील राष्ट्रपती शौर्य पदक मिळालेली निशा पाटील हिचा आदित्य ठाकरे यांनी सत्कार केला. तर जनतेला व्यापीठावरुन साष्टंग नमस्कार घातला.युवासेनेची बाईक रॅलीआदित्य ठाकरे यांचे पाचोरा शहरात दुपारी १.४० ला आगमन झाले. कृष्णापुरी चौकापासून शहरातून युवासेनेने बाईक रॅली काढत स्वागत केले प्रमुख मार्गावर भगवे ध्वज लावले होते. यावेळी पाचोरा भडगावचे माजी आ स्व आर ओ पाटील यांचे घरी ५ मिनिटे सांत्वनपर भेट देऊन २ वाजता सभास्थळी आगमन झाले महिला आघाडीतर्फे औक्षण करण्यात आले.आदित्य ठाकरे यांचा सत्कारपाचोरा शिवसेनेतर्फे बैलगाडीची प्रतिकृती, शालपुष्पहार व रोप देऊन आदित्य ठाकरे यांचा सत्कार आमदार किशोर पाटील व समपर्कप्रमुख अनिल सावंत यांनी केला. स्व. आर. ओ. पाटील यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.यावेळी मंचावर युवसेनाप्रमुख आदित्य ठाकरे खासदार संजय राऊत, खासदार गजानन कीर्तिकर तसेच एकनाथ शिंदे, रामदास कदम , गुलाबराव पाटील या मंत्र्यांसह जिल्ह्याचे नेते व माजी मंत्री सुरेशदादा जैन, आमदार चंद्रकांत सोनवणे, माजी आमदार चिमणराव पाटील, जिल्हाप्रमुख गुलाबराव वाघ व चंद्रकांत पाटील, पाचोरा नगराध्यक्ष संजय गोहिल, भडगाव नगराध्यक्ष अतुल पाटील यांचेसह मुकुंद बिलदीकर , माजी नगराध्यक्ष सुनीता किशोर पाटील, जि.प. सदस्य पदमसिंग पाटील, संजय पाटील, दिपकसिंग राजपूत, रावसाहेब पाटील, विकास पाटील, प्रताप हरी पाटील, उपजिल्हा प्रमुख गणेश पाटील , ाणेश परदेशी, भडगाव पं स. सभापती रामकृष्ण पाटील, शरद पाटे, अ‍ॅड. दिनकर देवरे, संभाजी भोसले, जे. के. पाटील, तालुकाप्रमुख डॉ. कैलास पाटील, शरद पाटील, रमेश बाफना, राजेश पाटील, युवासेनेचे अजय जैस्वाल, सुनील माळी, अनिकेत सूर्यवंशी, जितू पेंढारकर, प्रवीण पाटील, बापू हटकर, राम केसवणी, पप्पू राजपूत, पाचोरा नगरपालिकेचे सर्व नगरसेवक, महिला आघाडीच्या मंदाकिनी पाटील, बेबाबाई पाटील, सुनंदा महाजन यांचेसह शिवसेनेचे पदाधिकारी ,युवसेना पदाधिकारी आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन नाना वाघ यांनी केले.

टॅग्स :Politicsराजकारण