मुक्ताईनगर : जिल्ह्याचे प्रशासन हे नेहमी मजबूत, सक्रीय आणि जागरुक असले पाहिजे, दुर्देवाने तसे झाले नाही. प्रशासनाला वेग नसल्याने आणि हलगर्जी झाल्याने जिल्ह्यात कोरोना बाधितांच्या संख्येत वाढ झाली, अशी टीका माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी केली आहे.रुग्णांचे अहवाल येण्यास चार - चार दिवस लागत असल्याने कोरोनाचा प्रसार झपाट्याने होत असल्याचे ते म्हणाले.शुक्रवारी मुक्ताईनगर येथे माध्यम प्रतिनिधींशी बोलताना त्यांनी कोरोनाबाबत जिल्हा प्रशासनाला लक्ष्य केले.जिल्हा रुग्णालय शहरात आणावेकोविड रुग्णालय हे शहराबाहेर गोदावरी रुग्णालयात शिफ्ट करावे आणि जिल्हा रुग्णालय हे शहरात आणावे, म्हणजे सोयीचे होईल, असेही ते म्हणाले.सुरुवातील पीपीई किटची कमी होती. तपासणी करण्याची यंत्रणा नाही. एका रिपोर्टसाठी चार दिवस लागत आहे. धुळ्याला लॅब होऊ शकते मग आपल्याकडे का नाही? लॅब असती रुग्ण आटोक्यात असते.विधान परिषद निमित्ताने काही विषय निघाले आहेत. माझा संघर्ष हा व्यक्ती व पक्षाविरोधात तर मुळीच नाही. परंतु पक्षात लोकशाही असली पाहिजे हुकूमशाही नको, चारदोन लोक पक्ष चालवताहेत हे चित्र निर्माण झाले आहे. पक्षात लोकशाही पद्धतीने निर्णय व्हावे यासाठी प्रयत्न आहे.डीन आणि सिव्हील सर्जन यांच्यात बेबनाव आहे. त्यांच्यात समन्वय नसल्याने प्रशासनावरील पकड सैल झाली आहे. यासाठी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी हस्तक्षेप करायला हवा.ज्यावेळी पहिला रुग्ण आढळला त्याचवेळी प्रशासनाने जागरुक व्हायला हवे होते. त्यावेळी प्रशासनाने आवश्यक त्या उपाययोजना केल्या नाहीत. आपण ग्रीन झोनमध्ये आहोत. अशा भ्रमात हलगर्जीपणा झाला. अमळनेरच्या रुग्णाला घरी सोडण्यात आले. त्यामुळे कोरोनाचा प्रसार वाढला.लोकप्रतिनिधींचा प्रशासनावर दबाव असला पाहिजे. अधिकाऱ्यांमध्ये समन्वय असेल तरच समस्येचा मुकाबला करता येईल. पालकमंत्र्यांनी आढावा बैठका घेतल्या पण ते स्वत: बैठकांपुरताच मर्यादीत राहिले.प्रशासनाने सक्रीय राहून आपुलकीने काम करण्याची गरज आहे.मृत्यू रोखण्यास प्रशासनाला अपयश आले आहे. कोरोना ही राष्टÑीय आपत्ती समजून मृत्यू झालेल्या रुग्णांच्या कुटुंबाना मदत केली जावी. यासाठी शासनाने ५० लाखांचे वीमा संरक्षण दिले आहे.
कोरोनाबाबत प्रशासनाचा हलगर्जीपणा -एकनाथराव खडसे यांची टीका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2020 12:47 PM