शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
2
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
3
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
4
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
5
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
6
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
7
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
8
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
9
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
10
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
11
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
12
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
13
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
14
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
15
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
16
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
17
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
18
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
19
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
20
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा

25 कोटींवर प्रशासनाची मोहोर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 09, 2017 12:20 AM

निधीची प्रतिक्षा संपली : शासनाकडे प्रस्ताव रवाना

जळगाव : मुख्यमंत्री देंवेद्र फडणवीस यांनी मनपा क्षेत्रातील रस्ते विकास तसेच अन्य कामांसाठी 25 कोटींच्या निधीची घोषणा केली होती़ महानगर पालिकेने जिल्हा प्रशासनास सादर केलेल्या 25 कोटींच्या विकास निधिच्या प्रस्तावावर जिल्हाधिकारी रूबल अग्रवाल यांनी बुधवारी स्वाक्षरी करून हा प्रस्ताव पुढील कार्यवाहीसाठी नगरविकास विभाग मंत्रालयाकडे पाठविला आह़े यामुळे निधीअभावी ब्रेक लागलेल्या शहरातील अंतर्गत रस्त्यांचे भाग्य उजळणार आह़े मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस हे 2015 मध्ये जिल्हा दौ:यावर आले असता त्यांनी मनपा क्षेत्रातील रस्ते विकास तसेच अन्य कामांसाठी 25 कोटींच्या विकास निधीची घोषणा केली होती़ हा निधी गेल्या वर्षी मंजूर होवून निधी मनपाकडे वर्ग होण्यासाठी मनपा सभेकडून कामांचा ठराव करून तो जिल्हा प्रशासनाकडून शासनाकडे पाठविण्याबाबत कळविण्यात आले होत़े त्यानुसार महापालिकेने  महासभेत ठराव करून तो छाननीसाठी जिल्हा प्रशासनाकडे सादर केला होता़निधीचा मार्ग मोकळामहापालिकेची आर्थिक परिस्थिती नसल्याने गेल्या काही वर्षापासून शहरातील रस्ते दुरूस्तीच्या कामांना ब्रेक लागला होता़ यामुळे रस्त्यांची दयनीय अवस्था झाली  होती़ या पाश्र्वभूमिवर मुख्यमंत्र्यांनी 25 कोटींच्या निधीची घोषणा केली होती़ छाननीपूर्ण झाल्यानंतर जिल्हाधिकारी रूबल अग्रवाल यांनी प्रस्तावावर स्वाक्षरी करून महापालिकेसाठी वैशिष्टपूर्ण कामासाठी विशेष अनुदान ठोक तरतुदीन्वये 24 कोटी 98 लक्ष 42 हजार 298 रूपयांचा प्रस्ताव मंजुरी व अनुदान उपलब्ध होणेकामी शासनाकडे रवाना केला                               आह़े       यामुळे आता महापालि  केला रस्ते कामांसाठीचा 25 कोटी निधी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आह़े शहराअंतर्गत रस्त्यांचे उजळणार भाग्यराष्ट्रीय महामार्गावरील वाढते अपघात हा चिंतेचा विषय बनला आह़े त्यामुळे नागरिकांना महामार्ग टाळून शहरात ये-जा करण्यासाठी शहरातील अंतर्गत रस्ते सोयीचे आह़े मात्र त्याची दुरवस्था असल्याने नागरिकांना नाईलाजाने महामार्गावरून प्रवास करावा करावा लागत होता़ 25 कोटींचा प्रस्तावात रस्ते विकासाची 99 कामे आहेत़ त्यात राजा ट्रॅक्टर ते शिवाजीनगर, बळीराम पेठत भागातील रस्ते, गोविंदा रिक्षा स्टॉप ते भोईटे रेल्वे गेट व रेल्वे गेट ते बजरंग बोगद्यार्पयतचा मार्ग, कोर्ट चौक ते गणेशकॉलनी आदी प्रमुख रस्त्यांचा समावेश आह़े25 कोटींच्या निधीनंतर या रस्त्यांचा कामांना वेग येणार आह़े या रस्ते झाल्यास महामार्गावर वाहतुकीचा ताण कमी होवून अपघात टाळण्यास मदत होणार आह़े