सागर दुबेजळगाव : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ परिसरातील राज्य शासनाच्या आदिवासी मुलांच्या शासकीय वसतिगृहातील खानावळ अचानक बंद झाल्याने विद्यार्थ्यांना दररोज जेवणासाठी १ किलोमीटर पायपीट करावी लागत आहे़ तसेच पिण्याचे पाणीही पुरेसे मिळत नसल्याने विद्यार्थ्यांचे प्रचंड हाल होत असल्याचे ‘लोकमत’ प्रतिनिधीने शनिवारी या वसतिगृहात पाहणी केली असता दिसून आले.या वसतिगृहात योगेश ओजाऱ्या पावरा (रा. रोषमाळ, ता.धडगाव, जि.नंदुरबार) या विद्यार्थ्याचा शुक्रवारी मृत्यू झाला. थेट अनुदानाची रक्कम त्याच्या बँक खात्यात जमा होत नव्हती, त्यामुळे तो तणावात होता. या घटनेच्या पार्श्वभूमीवर ‘लोकमत’ने या वसतिगृहाला भेट देवून तेथील समस्या जाणून घेतल्या. प्रशासनाचे विद्यार्थ्यांच्या समस्यांकडे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून आले.३ पैकी २ कूपनलिका आटल्याविद्यापीठ परिसरात राज्य शासनाचे आदिवासी मुलांचे नवीन वसतिगृह आहे़ या ठिकाणी जामनेर, नंदुरबार, रावेर, धुळे, नाशिक असे वेगवेगळ्या ठिकाणाहून विद्यार्थी वास्तव्यास आहेत़ चार मजली इमारतीमध्ये १७० विद्यार्थ्यांचे वास्तव्य आहे. या ठिकाणी तीन कूपनलिका आहेत. त्यातील दोन कूपनलिका आटल्या आहेत. एका कूपनलिकेला कमी पाणी आहे. त्यामुळे आंघोळीला पाणी मिळावे यासाठी टँकरद्वारे पाणी पुरवठा होत होता़ दरम्यान, गेल्या दहा दिवसांपासून टँकरद्वारे मिळणारे पाणी सुध्दा बंद झाल्याचे विद्यार्थ्यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले़दररोज सकाळी व सायंकाळी जेवणासाठी पायपीटवसतिगृहात खाणावळ होती़ मात्र ती मे महिन्यात बंद पडल्यामुळे वसतिगृहात दुसरी खाणावळ सुरू करण्यात आली़ वसतिगृहातील विद्यार्थी हे महाडिबीटीद्वारे मिळणाºया पैशातून खाणावळीत जेवण करायचे़ मात्र, काही दिवसांपूर्वी ती खाणावळ देखील बंद झाली. त्यामुळे विद्यार्थ्यांचे प्रचंड हाल होत आहे. वसतिगृहापासून १ किलोमीटर अंतरावर असलेल्या विद्यापीठ परिसरातील किंवा बांभोरी येथील खाणावळीपर्यंत विद्यार्थ्यांना दररोज सकाळी व सायंकाळी पायपीट करावी लागत असल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले़अशा एक ना अनेक समस्यांमुळे विद्यार्थी त्रस्त आहेत. या समस्या मार्गी लावणे आवश्यक आहे.तक्रार करायची तर १५ कि.मी. अंतरावर जा...वसतिगृहातील कार्यालय हे नावालाच आहे़ विद्यार्थ्यांना समस्यांच्या तक्रारी किंवा त्यांच्या वसतिगृह प्रवेशासंदर्भात विचारपूस यासह महत्वाच्या कागपत्रांसाठी वसतिगृहापासून १५ किलो मीटर अंतरावर असलेल्या गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयातील वसतिगृहाच्या मुख्य कार्यालयात जावे लागते़ त्यामुळे विद्यार्थी नाराज आहेत.गृहपाल, रेक्टर दिसेनावसतिगृह गृहपाल व रेक्टर हे वसतिगृहातील कार्यालयात येत नसल्यामुळे विद्यार्थ्यांना त्यांच्या समस्या मांडण्यास व त्या सोडविण्यास अडचणी निर्माण होतात़ शनिवारी केलेल्या पाहणीत हे कार्यालय बंद अवस्थेत दिसून आले़ तर फक्त सफाई कर्मचारी त्या ठिकाणी दिसून आला़ गृहपाल व रेक्टर या ठिकाणी येतच नसल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला़ तर काहीवेळेस प्रशासन अधिकाºयांकडून तक्रारींकडे दुर्लक्ष केल्याचेही विद्यार्थ्यांनी सांगितले़वसतिगृहानजीक बस थांबा नाहीवसतिगृहातील विद्यार्थी सुविधांच्या अभावामुळे त्रस्त असताना, आणखी त्यात बस सुविधा मिळत नसल्याच्या समस्याने भर घातली आहे़ विद्यार्थ्यांना शहरात किंवा गावी जाण्यासाठी वसतिगृहाजवळ कुठलाही बस थांबा किंवा रिक्षा स्टॉपची सुविधा नाही़ अशा वेळी विद्यार्थ्यांना पुन्हा एक ते दोन किलोमीटर अंतरापर्यंत पायपीट करावी लागते़ त्यामुळे वसतिगृहाजवळून बस किंवा रिक्षाची सुविधा उपलब्ध करुन देणे आवश्यक आहे.रात्रीच्यावेळी पिण्यासाठी पाणी आणायचे कोठून?पिण्यासाठी पाणी नसल्यामुळे वसतिगृह प्रशासनातर्फे सकाळ व सायंकाळी प्रत्येकी १० असे एकूण २० पाण्याचे जार दररोज मागविले जात आहेत़ मात्र, कधी-कधी जार कमी पडत असल्यामुळे विद्यार्थ्यांना पिण्याचे पाणी मिळत नाही़ चार महिन्यांपूर्वी ३० जार मिळत होते. मात्र पुन्हा जारची संख्या कमी झालेली आहे़ त्यासाठी विद्यार्थ्यांना पिण्याच्या पाण्यासाठी रात्री-अपरात्री भटकंती करावी लागत आहे़ अनेक विद्यार्थी तहानल्या पोटीच झोपून जात असल्याचेही विद्यार्थ्यांच्या बोलण्यातून जाणवले.वसतिगृहाबाहेर प्लॅस्टिक पिशव्यांचा ढिगवसतिगृहात साफसफाईसाठी नियमित कर्मचारी येतो मात्र, वसतिगृह आवाराची सफाई होत नसल्यामुळे घाणीचे साम्राज्य पसरलेले असल्याचे चित्र पहावयास मिळाले. विशेष म्हणजे, वसतिगृहातील कचरा कपाउंडच्या बाहेर टाकला जात असल्यामुळे त्या ठिकाणी प्लॅस्टिक पिशव्यांसह कचºयांचा ढिगारा पसरलेला आहे. त्यामुळे दुर्गंधीसुद्धा येत आहे. भिंतींवर थुंकलेले तर कचराकुंड्या कचºयाने भरलेल्या होत्या. तसेच इमारतीच्या काही खोल्यांच्या खिडक्यांचे काचही फुटलेली तर गच्चीवर मार्गावर दरवाजाच नाही. त्यामुळे गच्चीवर कुणीही जावू शकते.
जळगावात वसतिगृहातील आदिवासी विद्यार्थ्यांची जेवणासाठी दररोज १ कि.मी. पायपीट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 07, 2018 12:21 PM
विद्यार्थ्यांचे प्रचंड हाल
ठळक मुद्देखाणावळ बंदपाण्यासाठीही भटकंती