यावल, जि.जळगाव : लहान मुलांवरील अत्याचारांसह महिलांविरोधात घडणारे गंभीर गुन्हे तसेच आर्थिक गुन्ह्यांमध्ये वकिली करण्यात मातब्बर असलेल्या अॅड. प्रकाश जगन्नाथ साळसिंगीकर यांची केंद्र शासनाने अतिरिक्त सरकारी अभियोक्ता म्हणून नियुक्ती केली आहे. एका तपाहून अधिक काळ मुंबईसह राज्यभरातील न्यायालयांमध्ये त्यांनी केलेल्या उल्लेखनिय कामगिरीची दखल घेत केंद्र शासनाने हा निर्णय घेतला आहे.भुसावळचे सुपुत्र असलेल्या अॅड.प्रकाश साळसिंगीकर यांनी भुसावळमधील नहाटा कॉलेजमधून २००२मध्ये वाणिज्य शाखेची पदवी मिळविली. त्यानंतर वकिलीच्या शिक्षणासाठी त्यांनी मुंबई गाठली. मुंबई विद्यापीठातून वकिलीचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर २००६ पासून खºया अर्थाने त्यांनी गुन्हेगारी विभागामध्ये आपल्या वकिलीला सुरुवात केली. मुंबईला हादरवून टाकणारे शक्ती मील सामूहिक बलात्कार प्रकरण, बेस्ट बेकरी खटला, अदनान पत्रावाला हत्या, कुरार व्हिलेज हत्याकांड, आयटी क्षेत्रातील तरुणी इस्थर अनुह्या हत्याकांड आणि डॉ.नरेंद्र दाभोलकर मर्डर केस अशा हायप्रोफाईल केसेससह अनेक खटल्यांमध्ये प्रभावीपणे युक्तिवाद करुन वकिलीच्या क्षेत्रात अॅड. साळसिंगीकर यांनी आपला ठसा उमटवला आहे.खान्देशचे सुपुत्र अॅड.उज्जवल निकम यांनी फौजदारी खटल्यात आंतरराष्ट्रीय कीर्ती मिळविल्यानंतर अॅड.साळशिंगीकर यांना मिळालेला बहुमान हा मानाचा तुराच आहे.मुंबई पोलीस दलातील आर्थिक गुन्हेशाखेकडे दाखल होत असलेल्या कोट्यवधी रुपयांच्या घोटाळ्यांच्या केसेस, तसेच एमपीआयडी केसेमध्ये शासनाने अॅड. साळसिंगीकर यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्त्या केल्या आहेत. अनेक प्रसारमाध्यमांतून अॅड. साळसिंगीकर यांनी कायदेतज्ज्ञ म्हणून उत्तमप्रकारे मार्गदर्शन केले आहे. त्यांच्या या कार्याची दखल घेत केंद्र शासनाच्या विधी आणि न्याय मंत्रालयाने ही नियुक्ती केली आहे.
अॅड.प्रकाश साळसिंगीकर यांची अतिरिक्त सरकारी अभियोक्ता म्हणून नियुक्ती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2019 6:25 PM
लहान मुलांवरील अत्याचारांसह महिलांविरोधात घडणारे गंभीर गुन्हे तसेच आर्थिक गुन्ह्यांमध्ये वकिली करण्यात मातब्बर असलेल्या अॅड. प्रकाश जगन्नाथ साळसिंगीकर यांची केंद्र शासनाने अतिरिक्त सरकारी अभियोक्ता म्हणून नियुक्ती केली आहे.
ठळक मुद्देएका तपाहून अधिक काळ मुंबईसह राज्यभरातील न्यायालयांमध्ये केलेल्या कार्याची घेतली दखलमुंबईला हादरवून टाकणाऱ्या अनेक खटल्यांमध्ये केला प्रभावी युक्तीवाद