कुंदन पाटील
जळगाव: फसवणुक प्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेल्या ॲड.प्रवीण चव्हाण यांना ‘होळी’पर्यंत कारागृहातच मुक्काम करावा लागणार आहे. ॲड.चव्हाण यांच्या जामीन अर्जावर सोमवारी न्यायालय सुनावणी करणार आहे. मराठा विद्या प्रसारक संस्थेतील वादप्रकरणी नीलेश रणजीत भोईटे (जळगाव) यांच्या फिर्यादीवरून दाखल गुन्ह्यात तत्कालिन सरकारी वकील ॲड. प्रवीण चव्हाण यांना आरोपी करुन दि.२६ फेब्रुवारी रोजी त्यांना अटक करण्यात आली होती.
त्यानंतर सोमवारी न्यायालयीन कोठडी सुनावल्यावर त्यांनी जामीनासाठी अर्ज सादर केला आहे. त्यानंतर सरकारी पक्षाने सत्र न्यायालयात चव्हाण यांना तपासकामी पोलीस कोठडी मिळावी, यासाठी सत्र न्यायालयात पुनर्विलोकन अर्ज सादर केला आहे. त्यामुळे ॲड.चव्हाण यांनी प्रथम वर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर केलेला जामीन अर्ज मागे घेतला आणि जामिनासाठी सत्र न्यायालयात सादर केला होता. ॲड.चव्हाण यांच्या जामीन अर्जावर आणि सरकार पक्षाच्यावतीने दाखल पुनर्विलोकन अर्जावर सोमवारीच सुनावणी होणार आहे. याप्रकरणात सरकारी पक्षाच्यावतीने ॲड.सुनील चोरडिया तर आरोपी पक्षाच्यावतीने ॲड.गोपाळ जळमकर कामकाज पाहत आहेत