जळगाव : वृत्तपत्र, इलेक्ट्रॉनिक मिडिया अथवा सोशल मिडियावर जाहिरात, प्रचाराचा मजकूर प्रसिद्ध करण्यापूर्वी तो जाहिरात प्रमाणीकरण समितीकडून प्रमाणित करून घेणे बंधनकारक असताना १३ उमेदवारांनी सोशल मिडियावर विना परवानगीच मजकूर प्रसिद्ध केल्याने त्यांना नोटीस बजावण्यात आल्या असून हा खर्च निवडणुक खर्चात का समाविष्ट करण्यात येऊ नये? म्हणून खुलासा मागविला आहे.विधानसभा निवडणुकीसाठी भारत निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार उमेदवारांनी वृत्तपत्र, इलेक्ट्रॉनिक मिडिया, सोशल मिडियावर जाहिरात, प्रचाराचा मजकूर प्रसिद्ध करण्यापूर्वी तो जाहिरात प्रमाणीकरण समितीकडून प्रमाणित करून घेणे आवश्यक आहे. तसेच त्यासाठी येणारा खर्च हा उमेदवाराच्या, पक्षाच्या निवडणूक खर्चात धरला जातो.मात्र अनेक उमेदवारांकडून सोशल मिडियावरील जाहिरातींसाठी पूर्व परवानगीच घेतलेली नाही. परस्पर प्रचाराच्या जाहिराती सोशल मिडियावर प्रसिद्ध केल्या जात आहेत.यावर समितीकडून लक्ष ठेवले जात आहे.त्यानुसार १३ उमेदवारांनी परवानगी न घेतल्याचे आढळून आल्याने त्यांना नोटीस बजावण्यात आल्या असल्याची माहिती जिल्हा माहिती अधिकारी विलास बोडके यांनी दिली.यांना दिली नोटीसनोटीस दिलेल्या उमेदवारांमध्ये चंद्रकांत बारेला चोपडा, चंद्रकांत पाटील, अॅड.रोहीणी खडसे मुक्ताईनगर, जगन सोनवणे भुसावळ, अनिल भाईदास पाटील, अमळनेर, मंगेश चव्हाण, चाळीसगाव, संजय गरूड जामनेर, किशोर पाटील, दिलीप वाघ, अमोल शिंदे, पाचोरा, अनिल चौधरी रावेर, सतीश सुरवाडे, भुसावळ, हरीभाऊ जावळे, रावेर यांचा समावेश आहे.
सोशल मीडियावर जाहिरात, १३ उमेदवारांना नोटीस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 15, 2019 12:09 PM