ऑनलाइन लोकमत
जळगाव, दि. 22 - पुणे ते पाचोरा प्रवासादरम्यान महाराष्ट्र एक्सप्रेसमधून चोरीस गेलेली बॅग तब्बल १० वर्षांनी संबंधित प्रवाशास रेल्वे पोलिसांनी दिली.
बरेच वर्षे उलटल्याने या बॅगबाबत आशा नसताना अनपेक्षितपणे ती मिळाल्याने एक वेगळा आनंद या प्रसंगी संबंधिताच्या चेहºयावर दिसून आला. या घटनेबाबत माहिती अशी की पाचोरा येथील रहिवासी सचिन सोमवंशी हे १० वर्षापूर्वी पुणे येथून महाराष्ट्र एक्सप्रेसने पाचोरा येथे येताना त्यांची बॅग चोरीस गेली होती. याबाबत भुसावळ रेल्वे पोलिसात शून्य क्रमांकाने गुन्हा दाखल होवून चाळीसगाव रेल्वे पोलिसाकडे वर्ग झाला होता.
जामनेर येथून ८ वर्षापूर्वी आरोपी पकडला होता. चाळीसगाव पोलिसांनी बॅगसह कपडे, घड्याळ, मोबाईल आदी साहित्य आरोपीकडून हस्तगत केल्यावर भुसावळ कोर्टामार्फत दिलेल्या निकालानुसार पाचोरा रेल्वे पोलिसांनी बॅग व साहित्य सोमवंशी यांना दिले. पाचोरा रेल्वे सहायक फौजदार प्रकाश गिरी, भास्कर दामोदर, ईश्वर बोरुडे आदींच्या उपस्थितीत ही बॅग देण्यात आली.